शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पंढरीच्या वारीमध्ये दंग झाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, वारकऱ्यांबरोबर रमला अन्…; साधेपणाचं होतंय सर्वाधिक कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 3, 2024 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actor Sandeep Pathak shared the special moments of participating in Pandharpur Wari.

Video : पंढरीच्या वारीमध्ये दंग झाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, वारकऱ्यांबरोबर रमला अन्…; साधेपणाचं होतंय सर्वाधिक कौतुक

आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. संताचा पालखी सोहळा आणि पायी जाणारे वारकरी ही परंपरा जाणून महाराष्ट्रातील एक आकर्षणच आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. पायी वारी करण्याचा अनुभव हा अदभूतच असतो. ज्ञानोबा, तुकोबांसह अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असतात. असंख्य वारकरी तन्मयतेने, पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हा नयनरम्य सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे.

याच वारीचा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी सामान्य वारकऱ्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभाग् घेत असतात. असाच वारीत सहभागी होणारा मराठी कलाकार म्हणजे अभिनेता संदीप पाठक. संदीप पाठक गेली अनेक वर्षे या वारी सोहळ्यात सहभागी होत आहे. मराठी चित्रपट, नाटक व मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला अभिनेता संदीप पाठक यंदाच्या वारीतही सहभागी झाला आहे. या वारी सोहळ्यातील काही खास क्षण त्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Shyamrao Pathak (@mesandeeppathak)

आणखी वाचा – “मला शहाणपणा शिकवू नका”, AI च्या वापराबद्दल सुबोध भावेचं रोखठोक मत, म्हणाला, “कलाकारांच्या पोटावर पाय…”

संदीपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वारीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधत, त्यांच्याबरोबर गप्पा मारत चालताना दिसत आहे. तसेच वाटेत भेटण्याऱ्या लहानग्यांशीही तो खास संवाद साधत आहे. वारीतील अनेक वारकरीही संदीपबरोबर येऊन खास संवाद साधत आहेत. त्याला मिठी मारत त्याच्याशी गप्पा मारत आहेत. पायी चालते मी पंढरी गं, वारीचे रंग विठोबा संग” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – जावईबापूंचा मानपान, सासू-सासऱ्यांची खास तयारी अन्…; सासरवाडीत प्रथमेश परबचे लाड, पत्नीने शेअर केले खास फोटो   

दरम्यान, संदीपने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. लाईक्स व कमेंट्स करत अभिनेत्याच्या या कृतीबद्दल त्याचे कौतुक केलं आहे. “राम कृष्ण हरी”, “माऊली माऊली”, “जय हरी विठ्ठल” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.  

Tags: marathi actormarathi entertainment newssandeep pathakSandeep Pathak Pandharpur Wari
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra fame actress Namrata Sambherao shared special photos on social media of her new farmhouse.

नम्रता संभेरावने जुन्नरमधील गावात बांधलं हक्काचं घर, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.