मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मध्य रेल्वेवर AC ट्रेन वेळेवर नाहीत”, सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “ट्रेनमध्ये चढून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2024 | 3:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshata Apte Angry On Ac Train

"मध्य रेल्वेवर AC ट्रेन वेळेवर नाहीत", सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "ट्रेनमध्ये चढून..."

आजकाल रस्त्यांची दुरावस्था आणि ट्रॅफिक पाहता कलाकार मंडळीही ट्रेनने प्रवास करु लागले आहेत. अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांचा ट्रेन प्रवासाचा अनुभव चाहत्यांसह शेअर करतात. हल्ली मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवा सुरु झाल्याने बरेच कलाकार त्याच्या वेळेची बचत करण्यासाठी या सेवांचा वापर करतात. मात्र यादरम्यानही अनेकदा त्यांना वाईट अनुभव आलेले आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ट्रेन प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवावर भाष्य करत आपलं मत मांडलं आहे. ट्रेन वेळेत नसताना अभिनेत्रीला मनस्ताप सहन करावा लागला असल्याने तिने राग व्यक्त केला आहे. (Akshata Apte Angry On Ac Train)

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षता आपटे हिने यावरुन भाष्य करत राग व्यक्त केला आहे. एसी लोकल वेळेत येत नसल्याने तिकिटाचे पैसे कसे वाया जातात या मुद्द्यावर तिने भाष्य केलं आहे. या प्रकरणावर खरमरीत पोस्ट शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “मध्य रेल्वेवर AC trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर. दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे upgrade करून द्यावं. AC train पकडण्याच्या तयारीत AC चं तिकीट काढलं तर ट्रेन येता येत नाही, वाट बघण्यात वेळ वाया जातो आणि शेवटी साधीच गाडी पकडून यावं लागतं, AC ट्रेनच्या तिकिटाचे पैसे वाया जातात आणि ‘जाऊदे आता AC train कधीच निघून गेली असेल’ असं म्हणून साधं किंवा even First Class च तिकीट असेल तर नेमकी (भयंकर late असलेली) AC train तेव्हा येणार”.

आणखी वाचा – Video : पंढरीच्या वारीमध्ये दंग झाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, वारकऱ्यांबरोबर रमला अन्…; साधेपणाचं होतंय सर्वाधिक कौतुक

View this post on Instagram

A post shared by Akshata Atul Apte (@akshataapte)

पुढे ती म्हणाली, “घाईघाईत तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढून येण्याइतपत वेळ नसतो, आणि प्रत्येक स्थानकावर ATVM मशीन सुद्धा नसतात अशावेळी त्या ट्रेनमध्ये चढून TC फक्त १५/- चा फरक असला तरीही दंड आकारणार. म्हणजे तेही पैसे आपली काही चूक नसताना जावेत. असा गोंधळ माझ्या बाबतीत अनेकदा झाला आहे. म्हणजे मी First Class चं तिकीट असताना शिस्तीत दंड सुद्धा भरला आहे आणि अचानक indicator वर unexpectedly AC train दिसल्यावर दादरला ८ नं. वरुन धावत वर जाऊन main window वर जाऊन तिकीट काढून येईपर्यंत train गेली आहे. या दोन्ही cases मध्ये AC train भयंकर उशिरा होती आणि मला खरंच कुठेतरी पोहोचण्याची घाई होती. पैसे वायाच दोन्हीकडे. यात चूक कोणाची?”, असा सवाल तिने केला आहे.

आणखी वाचा – ‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस ओटीटी ३’चा विजेता, अरमान मलिकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

“वाहतूक कोंडी कमी व्हावी, प्रवासाचा वेळ वाचावा आणि थोडा आरामदायी प्रवास व्हावा म्हणून चालू केल्या आहेत ना AC ट्रेन्स? त्यासाठी प्रामाणिकपणे तिकीटाचे एवढे पैसे खर्च केल्यावर इतक्या rare trains इतक्या बेभरवशाच्या वेळेत आल्या तर कसं चालेल?? उलट त्या तर top priority असल्या पाहिजेत ना. काय वाटतं? आणि M-indicator सुद्धा अशावेळी नेमकं कसं माती खातं के कळत नाही”.

Tags: akshata apteAkshata Apte Angry On Ac Trainentertainmentmarathi actressNavri Mile Hitlerala
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
arun kadam playing tabla video shared on instagram

Video : पडद्यामागे तबला वाजवू लागले अरुण कदम, नाटकाच्या प्रयोगापूर्वी बॅकस्टेज धमाल, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.