मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला शहाणपणा शिकवू नका”, AI च्या वापराबद्दल सुबोध भावेचं रोखठोक मत, म्हणाला, “कलाकारांच्या पोटावर पाय…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 3, 2024 | 12:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actor Subodh Bhave expressed his disapproval of AI technology in the serials by saying "don't teach me".

“मला शहाणपणा शिकवू नका”, AI च्या वापराबद्दल सुबोध भावेचं रोखठोक मत, म्हणाला, “कलाकारांच्या पोटावर पाय...”

सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) चर्चा सुरू आहे. अशातच छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत AI चा वापर होणार आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे हा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अभिनेता सुबोध भावेने याआधी चित्रपटात, मालिकेत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच तो आता ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात सुबोधच्या तरुणपणातील भूमिकेसाठी मालिकेत AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.  या AI च्या वापराबाबत अनेक मतमतांतरे समोर येत आहेत. अनेकजण त्याच्या सकारात्मक पैलूबाबतही बोलताना दिसतात. तर काहींनी याबाबत विरोधाचा सुर आळवल्याचेही पाहायला मिळाले.

अशातच AI च्या वापराबाबत सुबोध भावेने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. नुकताच सुबोधने त्याच्या आगामी ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या निमित्ताने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी AI च्या वापराबद्दल भूमिका स्पष्ट करताना सुबोधने असं म्हटलं की, “AI च्या वापरामुळे कुणाच्या पोटावर आणलेला नाही. लहानपण मीच करायचं असं जर ठरवलं असतं तर कुणाला घेणार होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की नवीन कलाकारांच्या पोटावर पाय आहे असं म्हणत आहात, तर सध्या ३५ मालिका सुरु आहेत, त्यापैकी एका मालिकेत मी काम करत आहे. म्हणजे ३४ कलाकारांच्या पोटावर मी पाय दिलेला नाही ना? आणि मीदेखील एक अभिनेता आहे, त्यामुळे जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी अभिनय करत  राहणार आहे”.

आणखी वाचा – Video : “जाड आहे या गोष्टीचा…”, विशाखा सुभेदारांच्या ‘त्या’ व्हिडीओची चर्चा, नेटकरीही कमेंट करत म्हणाले, “तुम्ही जशा आहात…”

यापुढे सुबोध भावेने असं म्हटलं की, “त्यामुळे पोटावर पाय वगैरे हा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरचा शहाणपणा मला शिकवू नका. मीदेखील अनेक गोष्टींचा सोडून, अनेक गोष्टींचा त्याग करुन इथे कलाकार म्हणून आलो आहे. माझे हजार व्यवसाय नाहीत. माझं दुकान पण आहे. बिल्डर पण आहे आणि राजकारणातूनही मला पैसा येत आहे असं नाही. माझं पोट, माझं रक्त आणि माझा जीव फक्त अभिनयावरच आहे त्यामुळे मी हेच करत राहणार आहे. त्यामुळे नवीन कलाकारांच्या पोटावर पाय हा शहाणपणा दुसऱ्या कुणाला तरी शिकवा. मला शिकवू नका. मी इथे अभिनय करायला आलो आहे, जो मी मरेपर्यंत करणार”.  

आणखी वाचा – जावईबापूंचा मानपान, सासु-सासऱ्यांची खास तयारी अन्…; सासरवाडीत प्रथमेश परबचे लाड, पत्नीने शेअर केले खास फोटो   

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्मिला शिंदे या अभिनेत्रीनेही “कृपया एआयचा वापर टाळा आणि हाडामांसाचे कलाकार कास्ट करा. AI ला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एकसारखे दिसणारे कलाकार सापडतील” असं म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. अशातच सुबोध भावेने या AI च्या वापरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Tags: marathi actormarathi entertainment newssubodh bhaveSubodh Bhave on AI Technology
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Bigg Boss OTT 3

'हा' स्पर्धक ठरणार 'बिग बॉस ओटीटी ३'चा विजेता, अरमान मलिकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.