टेलिव्हिजन विश्वातील ‘गोपी बहू’ने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये अभिनेत्री पांढऱ्या रंगाच्या बॉडीफिट ड्रेस घालून बीचवर पोज देताना दिसली. या फोटोंमध्ये नेटकऱ्यांना देवोलीनाचा बेबी बंप दिसत होता. त्यानंतर ही अभिनेत्री आई होणार असल्याच्या अफवा सर्वत्र पसरु लागल्या. आता या बातम्यांवर मौन सोडत देवोलीनाने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. (Devoleena On Pregnancy Rumours)
देवोलीना भट्टाचार्य हिने तिच्या गरोदरपणाबाबत बोलताना एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, “अनेक लोक मला माझ्या प्रेग्नेंसीबाबत मॅसेज पाठवत आहेत. पण, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला तुमच्याशी काही बातम्या शेअर कराव्या लागतील, तेव्हा मी ते स्वतः करेन. तेव्हा कृपया मला आत्ता त्रास देऊ नका”.

देवोलीनाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “माझ्या प्रेग्नेंसीबद्दल कळल्यानंतर तुम्ही काय कराल? तुम्ही हेडलाईन बनवाल का. तुम्ही तुमचा कंटेंट लिहाल का?. किंवा ट्रोल कराल किंवा काही लोक माझ्यासाठी दोन-तीन चांगल्या गोष्टीही लिहतील. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मला यापैकी काहीही नको आहे कारण हे माझे आयुष्य आहे. आणि ही माझी वैयक्तिक जागा आहे. त्यामुळे मला त्रास देण्याचा तुम्हाला अधिकार नाही”.
देवोलीना भट्टाचार्यच्या या बीचवरील फोटोंमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रश्नांचा भडीमार केला. नेटकरी गोपी बहूला ती प्रेग्नंट आहे का?, असं विचारु लागले आहेत. याशिवाय काही लोकांनी अभिनेत्रीचे अभिनंदनही केले आहे. देवोलिना भट्टाचार्य एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘साथ निभाना साथिया’ या टीव्ही शोमधून केली होती. या शोमुळे अभिनेत्री रातोरात स्टार बनली. टीव्हीच्या सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या सीझन १३ मध्ये ही अभिनेत्री दिसली होती.