बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सत्य समजताच अहिल्यादेवींचा राग अनावर, आदित्यला आई म्हणण्यास दिला नकार, पारूलाही सुनावलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

सत्य समजताच अहिल्यादेवींचा राग अनावर, आदित्यला आई म्हणण्यास दिला नकार, पारूलाही सुनावलं अन्…

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळतं आहे की, अहिल्यादेवी समोर जाहिरातीचे सत्य अखेर आलेलं असतं. अवॉर्ड फंक्शनमध्ये कोणताच तमाशा नको म्हणून त्या त्या वेळेला काहीच बोलत नाहीत मात्र त्यांचा प्रचंड राग अनावर झालेला असतो. त्यानंतर त्या पारू व आदित्यला ट्रॉफी देतात आणि तिथून ताडकन निघून जातात. किर्लोस्कर बंगल्यात जेव्हा त्या पोहोचतात तेव्हा तुफान पाऊस सुरु असतो. त्या पावसातच त्या बाहेर जाऊन उभ्या राहतात आणि गार्डनमध्ये बसतात श्रीकांतही त्यांच्याबरोबर बसतो. श्रीकांत त्यांना समजवायचा प्रयत्न करतो मात्र त्या काहीच समजून घेत नाहीत आणि त्या सांगतात की, मी थोडावेळ इथेच बसते नंतर आत येते. (Paaru Serial Update)

तर इकडे दिशा व दामिनी हा खेळ पाहत मज्जा घेत असतात. तेव्हा दिशा म्हणते की, आता मी नवीन ड्रामाच करते. तितक्यात श्रीकांत अहिल्यादेवींची समजूत काढून त्यांना घरी आणत असतात तेव्हा दिशा मुद्दाम पुढे पुढे करत अहिल्यादेवींना काही झालं तर नाही ना म्हणून काळजी घेते. घरात येताना आदित्य ही तिथे पोहोचतात. तेव्हा आदित्य अहिल्यादेवींच्या अंगावर शाल टाकायला जातो तेव्हा अहिल्यादेवी ती शाल उडवून देतात आणि आदित्यच्या सणसणीत कानाखाली मारतात आणि सांगतात की, तू जेव्हा मॉडेल म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतलास तेव्हाच तुझं आणि माझं नातं संपलं.

आणखी वाचा – प्रभास-दीपिकाच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू, ‘या’ चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, दोन दिवसांत तब्बल इतकी कमाई

एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस?, तुला मला हे एकदाही सांगावसं वाटलं नाही का?, यावर मध्ये-मध्ये दिशा आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. पारुलाही दिशा भरपूर बोलते तर मारुती सांगतो की, यात माझी काही चुकी नाहीये मला यातलं काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर अहिल्यादेवी पारूलाही म्हणतात की, तू मला देवी आई म्हणतेस ना मग तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी लपवलीस?, मग इतके दिवस तू आमच्यासाठी जे काही केलं ते सगळं नाटक होतं का?, असा सवाल करतात.

आणखी वाचा – “लोकांनी त्याचं…”, बिअर प्यायल्याच्या ‘त्या’ वक्तव्यावरील ट्रॉलिंगबाबत अदिती सारंगधर स्पष्टच बोलली, म्हणाली, “अख्खी बाटली…”

तर आदित्यलाही त्या खडे बोल सुनावतात आणि सांगतात की, एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुला मला एकदाही विचारावस वाटलं नाही का आणि इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली कशी?, त्यानंतर त्या श्रीकांतला म्हणतात की, याच्यावर मी कसा विश्वास ठेवू हे तूच मला सांग, असं म्हणत त्या प्रचंड चिडतात. आता मालिकेच्या पुढील भागात अहिल्यादेवी या सगळ्यावर काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 3, 2026 | 12:10 pm
 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Next Post
Rakhi Sawant Health

राखी सावंतच्या गर्भाशयात आणखी एका ट्युमरचं निदान, भावानेच दिली माहिती, म्हणाला, "मोठी शस्त्रक्रिया…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.