बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राखी सावंतच्या गर्भाशयात आणखी एका ट्युमरचं निदान, भावानेच दिली माहिती, म्हणाला, “मोठी शस्त्रक्रिया…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rakhi Sawant Health

राखी सावंतच्या गर्भाशयात आणखी एका ट्युमरचं निदान, भावानेच दिली माहिती, म्हणाला, "मोठी शस्त्रक्रिया…"

नेहमीच चर्चेत राहणारी राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. राखीच्या पोटात गाठ वाढली असून त्यावर उपचार सुरु होत्र. मात्र, जेव्हा राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा अनेकांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते. पण राखी तिच्या तब्येतीबाबत एक महिन्याहून अधिक काळ उपचार घेत आहे. एवढेच नाही तर राखीला किडनीचा काही त्रास असून तिला हृदयविकार असल्याचेही डॉक्टरांनी निदान केले होते. आता राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याने तिच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा राखीच्या चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पसरलं आहे. (Rakhi Sawant Health)

राखीचा भाऊ राकेश सावंत यांच्या म्हणण्यानुसार, राखी आधीच बरी होत आहे पण डॉक्टरांनी सांगितले आहे की आणखी एक ट्यूमर तिच्या पोटात आहे, ज्याची सध्या तपासणी सुरु आहे. राकेश म्हणाले की, “डॉक्टरांनी पहिली गाठ काढली होती, त्यासाठी राखीवर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र आता आणखी एका ट्यूमरमुळे काहीसा त्रास निर्माण झाला आहे”.

आणखी वाचा – सत्य समजताच अहिल्यादेवींचा राग अनावर, आदित्यला आई म्हणण्यास दिला नकार, पारूलाही सुनावलं अन्…

तथापि, राकेशने असेही सांगितले की, सध्या राखी तीन-चार महिने बेड रेस्टवर असेल आणि ती हळूहळू तिच्या शरीरातील कमजोरीतून बरी होईल. राखीचा भाऊ राकेश सावंत याने सांगितले की, “राखी सध्या बरी आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली एवढी मोठी शस्त्रक्रिया करुन राखी सावंत बरी होत आहे”. तो म्हणाला की, “राखी आता खूपच निरोगी आहे. म्हणजेच तिची प्रकृती सुधारत आहे आणि ती पूर्वीपेक्षा खूप बरी आहे”.

आणखी वाचा – अनधिकृत पब, बारवरील कारवाई अन्…; महाराष्ट्रातील ‘या’ मुद्द्यांवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचं रोखठोक भाष्य, म्हणाला, “ज्यांनी हे मोकाटपणे…”

राखीच्या तब्येतीबद्दल राकेश सावंत यांनी एका मीडिया वाहिनीशी बोलताना असेही सांगितले की, “लोक राखीबद्दल सर्व प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. ते तिच्याबद्दल वाईट बोलत आहेत. त्यांनी हे सर्व करु नये. सध्या राखी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे”. ‘बिग बॉस OTT ३’ मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या अरमान मलिकच्या दोन पत्नींवर अलीकडेच राखी सावंतने टीका केली. राखीने एक व्हिडीओ जारी करत म्हटले की, “पायल खूश नाही. आपल्या देशात मुलींना लहानपणापासूनच नवऱ्याला प्रत्येक निर्णयात साथ कशी द्यायची हे शिकवले जाते. त्यामुळे ती अरमानला सपोर्ट करत आहे”.

Tags: entertainmentrakhi sawantrakhi sawant healthrakhi sawant tumour
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
Next Post
T20 World Cup Final 2024

Video : भारताच्या विजयानंतर मैदानातूनच बायको, मुलांना विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल, ‘तो’ क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद, लेकीने व्यक्त केली काळजी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.