जसा नवीन ट्रेंड येतो तसे सगळेच जण तो ट्रेंड फॉलो करतात. आज काल फोटोशूट करण्याचा ट्रेंड मार्केट जाम करताना दिसतोय. सोशल मीडियाच्या काळामध्ये फोटोशूट करणे आता प्रत्येकासाठीच सोप्प झालं आहे. पूर्वी काही कार्यक्रम, सण, सोहळा असल्यावरचं कलाकार किंवा सर्वसामान्य व्यक्ती छान यावरून सावरून फोटोशूट करत असतं. पण आता या फॅडमुळे आपण कसे वेगवेगळे फोटो शूट करू शकतो यावर सगळ्यांचा भर असतो. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणे म्हणजे लोकांना आपल्या पोस्ट केलेल्या गोष्टींवर त्यांना चांगलं वाईट बोलण्याचा अधिकार देणे. मग या मध्ये तुम्हाला चांगले कमेंट्स येतात. किंवा तुम्हाला ट्रोल केलं जाऊ शकतं. काही जण त्यांचं कमेंट बॉक्स ऑफ करून ठेवतात तर काही जण त्याला सडेतोड उत्तर देताना दिसतात. (Rutuja Bagwe Get Trolled)

हे देखील वाचा: कोठारे-पिळगावकर कुटुंबा बाबत अनोखा योगा योग!वडिलांनी चित्रपट सृष्टीत आणलं आणि पाहिल्याचं चित्रपटात मिळवले पुरस्कार
मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा हिला खरी ओळख “नांदा सौख्य भरे” या मालिकेपासून मिळाली. याच बरोबर ऋतुजाला “अनन्या” या नाटकातून प्रेक्षकांची पोचपावती सुद्धा मिळाली आहे. सध्या ऋतुजाने कामातून ब्रेक घेतला आहे. परंतु ऋतुजा तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटोज तसेच व्हिडीओज नेहमी शेअर करत असते. ऋतुजाने मध्येच तिच्या फोटोशूटचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. ऋतुजाने पुन्हा एकदा या फोटोशूटचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर एका नेटकऱ्याच्या नकारात्मक कमेंटला ऋतुज्याने चांगलेच उत्तर दिले आहे.

हे देखील वाचा: ‘बाबा तुम्हाला जाऊन 25 वर्ष झाली ..’वडिलांच्या आठवणीत अभिनेता प्रसाद खांडेकर भावुक
या फोटोला ऋतुजाने ” Work on it & then flaunt it ” असे कॅप्शन दिले आहे. परंतु ऋतुजाच्या या फोटोला “नक्की मल्लिका शेरावत बनायची इच्छा आहे वाटते” अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. या कमेंटला ऋतुज्याच्या एका चाहत्याने “सॉरी पण ऊटफिट वरून जज कसे काय करू शकता? आणि मल्लिका शेरावत होण्या सारखं नाहीये हा, हा ऊटफिट” असे या कमेंटला उत्तर दिले आहे. या कमेंटवर ऋतुजाने सुद्धा रिप्लाय केलाय. (Rutuja Bagwe Get Trolled)
ऋतुजा तिच्या चाहत्याला म्हणाली thank you …
“आणि सरड्याची धाव कुंपणापर्यंत, त्यांनी फक्त तिच्या फिल्म्स पहिल्या असतील किंवा त्यांची आवडती असेल, म्हणून तीच आठवली असेल पटकन, सरड्याची धाव कुंपण पर्यंत आपण लक्ष नाही द्यायचं” असं म्हणत नेटकऱ्याला खडेबोल सुनावले आहेत. या आधी ऋतुजाच्या एका फोटोवर निखिल बनेच्या कमेंट मूळे ऋतुजा चर्चेत आली होती.