आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले आई वडील. कोण जास्त आईच्या जवळचा असतो तर कोणाला वडील जास्त जवळचे वाटतात. मात्र दोघांवरही आपलं तेवढच प्रेम असत. पण जेव्हा या दोघांपैकी एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा होणार त्रास सहन न होणार असतो. मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता प्रसाद खांडेकरने देखील आपल्या वडिलांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट केली आहे.
प्रसाद सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. सोबतच त्याच कुर्रर्रर्र हे नाटक सुद्धा चांगलंच चर्चेत आहे. असतंच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून फॅमिली सोबतचा एक फोटो पोस्ट करत भावुक पोस्ट लिहिली आहे.(Prasad Khandekar Father)
त्याने पोस्टच्या कॅप्शन मध्ये ‘बाबा तुम्हाला जाऊन 25 वर्ष झाली ….जो काही मला 14 वर्षांचा तुमचा सहवास लाभला आणि त्यात तुमच्याकडून जे काही बाळकडू घेतलं ….त्या तुम्ही दाखवलेल्या वाटेवर अजून ही चालतो आहे ….थोडा धडपडतोय पुन्हा उभा राहतोय घरच्यांना सांभाळतोय.. मित्रांना जपतोय …कला जोपासतोय जमेल तशी समाजसेवा करतोय …..पण प्रत्येक क्षणाला तुमची आठवण आल्या शिवाय राहत नाही ….मला माहिती आहे जिथे असाल तिथून लक्ष ठेवून आहात .. म्हणूनच योग्य दिशेने चाललोय आम्ही सगळे…बाबा आहात तिथे खुष राहा आणि कायम आम्हा सगळ्यांवर आशीर्वाद ठेवा खूप खूप प्रेम आणि घट्ट घट्ट मिठी love you’ असं लिहिलं आहे.
हे देखील वाचा – म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’
प्रसादाचे वडील स्वर्गीय महादेव खांडेकर हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असून शिवसेना पक्षात अक्रिय असल्याचं प्रसाद ने पोस्ट केलेल्या पाहतो मधून दिसत आहे. प्रसाद सध्या नाटकांच्या दौऱ्यासाठी अमेरिका येथे असून त्याच्या सोबत नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे हे कलाकार देखील आहेत.(Prasad Khandekar Father)