‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, साक्षीने बाजी मारत अर्जुन-चैतन्यला संकटात टाकलेलं असतं. मालिकेत अर्जुन-चैतन्य स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढत असतात. तर रविराज यावेळी त्यांची मदत करताना दिसतो. तसेच सायली व सुभेदार कुटुंबीयही अर्जुनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. दरम्यान मालिकेत अर्जुन व चैतन्यची सनद रद्द होणार की नाही याचा निकाल आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. (Tharal Tar Mag Serial Update)
मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, रविराज अर्जुनला शांत राहण्याचे आवाहन करतो. सायली अर्जुनला बार कौन्सील निर्णयाबद्दल विचारण्यासाठी फोन करताच अर्जुन नंतर बोलायचे सांगून तिचा फोन ठेवतो. अर्जुनची वाईट अवस्था पाहून चैतन्य अस्वस्थ होत स्वतःला दोष देतो आणि तिथून तडकाफडकी निघून जातो. नागराज व प्रिया महीपतला खास भेटायला येतात आणि चैतन्य-अर्जुनची वकिली सनद रद्द करण्याबाबत चर्चा करतात.
बाहेर येऊन अर्जुन व रविराज चैतन्यला शोधू लागतात. तर इकडे नागराज आश्रम केस गुंडाळण्याबाबत प्रियाशी बोलतो. चैतन्य प्रेस कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण प्रकारणाशी अर्जुनचा कुठलाही संबंध नसून मी एकटा जबाबदार असल्याची कबुली देतो. चैतन्य घरी येऊन अर्जुनला घडलेल्या चुकीचे प्रायश्चित म्हणून हे केल्याची कबुली देतो आणि माझ्या मित्रासाठी हे सारं केल्याची कबुली देतो. रविराजला बार कोन्सिल अर्जुन व चैतन्य प्रकरणाबाबत निर्णय कळवतात. अर्जुनला निर्दोष ठरवून चैतन्यची सनद सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येते. चैतन्य या गोष्टीचा आनंद व्यक्त करतो.
आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, तन्वी अर्जुनच्या ऑफिसमध्ये मॅरेज कॉन्ट्रॅक्टची फाईल मिळवायचा प्रयत्न करते आणि अर्जुन-चैतन्यच्या हे सारं नजरेस पडतं. आता अर्जुन प्रियाला या सगळ्याचा जाब विचारणार का?, प्रिया यावर काय उत्तर देणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.