‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रीतम व आदित्य ऍडशूटदरम्यान हरीशला नक्की कोणी फसवलं याचा शोध घेत असतात आणि त्याच्या शोधात असतात तर इकडे प्रीतमने ऍडशूटच्या वेळी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग भरवून घेतलेली असते. ते सगळे ऑफिसमध्ये जमतात तेव्हा प्रीतमही घाईघाईत तिकडे जायला निघतो. तेव्हा आदित्य म्हणतो की काही झालं तरी हरीशला कोणी फसवलं हे सत्य समोर यायलाच हवं आणि इतकंच नव्हे तर मला सुद्धा लवकरात लवकर आईला हे सगळं काही खरं सांगून टाकायचं आहे. हरीश पारु या सगळ्यांचं बोलणं दिशा चोरून ऐकते आणि दामिनीकडे जाते तर दामिनी तिकडे पत्ते खेळत बसलेली असते तेव्हा दिशा सांगते की, तुझ्याबद्दल सगळं काही घरात कळालं आहे. ते लोक हरीशला कोणी फसवले याचा शोध घेत आहेत आणि तूच त्याच्या सरबतात गोळी मिसळलीस हे सत्य देखील लवकरच समोर येणार आहे. (Paaru Serial Update)
यावर दामिनी सांगते की, पण हे सगळं तू मला करायला सांगितलं हे मी सांगणार. आणि मी एकटी या घरातून बाहेर पडणार नाही तर तुला सुद्धा घेऊन पडेल. यावर दिशा बोलते की, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे असं बोलून तिथून निघून जाते. तर ऑफिसमध्ये सगळेजण जमलेले असतात तेव्हा हरीश त्या कर्मचाऱ्यांपैकी नेमका कोणता कर्मचारी त्याला सरबत घेऊन आला होता हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याला काहीच समजत नाही त्या वेळेला पारू एका कर्मचाऱ्याला अचानक घाम फुटतो ते पाहते आणि सांगते की, तुम्हीच हे सगळं काही केलंय ना?, यावर तो कर्मचारी पुढे येतो आणि सगळं काही खरं सांगून टाकतो की, मी पैशाच्या लालचे पोटी दामिनी मॅडमची मदत केली आणि दामिनी मॅडमने सांगितलेलं सरबत हरीश सरांना नेऊन दिलं. हे ऐकल्यावर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते तर मोहनला ही खूप मोठा धक्का बसतो. तो सांगतो की, मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला जाब विचारतो आणि वहिनींसमोर उभं करतो, असं म्हणून तो तिथून ताडकन निघून जातो.
तर आदित्य ही मला सगळं काही आईला सांगायचं आहे असं म्हणून निघतो. घरी आल्यानंतर मोहन दामिनीला विचारतो तेव्हा दामिनी तिला काहीच माहिती नसल्याचा आव आणते. त्यानंतर मोहन दामिनीला दटावतो आणि विचारतो की, हे सगळं काही तूच केलं आहेस ना?, असं म्हणत हाताला धरत अहिल्यादेवींच्या खोलीत घेऊन येतो. मात्र अहिल्या देवी तिथे नसतात तर आदित्य व प्रीतम आधीच तिथे पोहोचलेले असतात तेव्हा आदित्यही दामिनीला विचारतो की, तू हे सगळं का केलं?, यावर दामिनी सांगते की मी असलं काही केलं नाही आहे. तुम्ही एका वेटरवर विश्वास ठेवून माझ्याशी भांडत आहात आणि हे सगळं करून मला काय मिळेल उलट मीच हे सत्य इतके दिवस लपवून ठेवलं हे ऐकून सगळ्यांनाच काहीतरी चुकतंय का असं वाटू लागतं. तर दिशाने आधीच प्लॅन करुन अहिल्यादेवी व श्रीकांत यांना तिचं नवं हॉटेल दाखवायला नेलेलं असतं. त्या वेळेला आदित्य सांगतो मी आत्ताच्या आत्ता आईला फोन करुन सगळं काही सांगणार आहे. आदित्य अहिल्यादेवींना फोन लावते.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्या देवी आदित्यचा फोन उचलतात तेव्हा आदित्य सांगतो ऍडशूटच्या दिवशी काय झालं होतं हे मला तुला आत्ताच्या आत्ता सांगायचं आहे खूप अर्जंट आहे. आता ऍडशूटचं सत्य देवी आईला समजणार का?, या मागचं कारस्थान दामिनीचं असल्याचेही सत्य समोर येणार का? हे सगळं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.