शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बेबीमूनसाठी निघाले दीपिका पदुकोण व रणवीर सिंह, विमानतळार एकदाही सोडला नाही बायकोचा हात, अशी घेत आहे काळजी

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 20, 2024 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
deepika padukone and ranveer singh on babymoon

बेबीमूनसाठी निघाले दीपिका पदुकोण व रणवीर सिंह, विमानतळार एकदाही सोडला नाही बायकोचा हात, अशी घेत आहे काळजी

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती आई होणार असल्याने अधिक चर्चेत आली आहे. अशातच तिचा एक चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या माध्यामातून ती प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या रूपात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रमोशनच्या वेळेचे अनेक व्हिडीओदेखील समोर आले. यामध्ये ती बेबी बंप दाखवताना दिसून आली. त्यानंतर ती लगेच पती रणवीर सिंहबरोबर एअरपोर्टवर दिसून आली. (deepika padukone and ranveer singh on babymoon)

चित्रपटाच्या प्री-रिलीजचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती रणवीरबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार दोघंही बेबीमूनसाठी लंडनला जात असल्याचे समजले आहे. या ठिकाणी रणवीर गरोदर पत्नीची किती उत्तम काळजी घेतो हे दिसून येत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोघांनीही काळ्या रंगाचे स्टायलिश कपडे घातले आहेत. या व्हिडीओमध्ये दीपिकाचं बेबी बंपही स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा – लेकीच्या लग्नाला जाणार नाहीत शत्रुघ्न सिन्हा?, म्हणाले, “तिला तिचा जोडीदार…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

याआधी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्येही दीपिका काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली होती. तिच्याबरोबर अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हसन व राणा डग्गुबतीदेखील दिसले. मात्र चित्रपटापेक्षा अधिक चर्चा दीपिकाने घातलेल्या उंच हिल्सची झाली. या चित्रपटामध्ये दीपिका पद्माच्या भूमिकेत दिसणार असून अमिताभ अश्वत्थामाच्या भूमिकेत तर कमल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला होता. चित्रपटातील भव्यदिव्यता पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.     

आणखी वाचा – सायलीसाठी अर्जुनने धरला निर्जळी उपवास, पोटात काहीच नसल्याने चक्करही आली अन्…; सगळ्यांसमोर सत्यही आलं

दीपिकाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, दीपिका व रणवीरने २०१८ साली लग्न केले. तसेच २९ फेब्रुवारी २०२४ साली त्यांनी बाळ येणार असल्याची गुडन्यूज चाहत्याबरोबर शेअर केली होती. तसेच दोघंही आता रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात एकत्र काम करतानाही दिसणार आहेत.

Tags: airportbabymoondeepika padukoneranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Narkar On Complement

"अपघातात ही बाई मरत का नाही?", ऐश्वर्या नारकरांनी कमेंट करणाऱ्यांची केली बोलती बंद, म्हणाल्या, "मी कोणाचं वाईटही केलं नाही पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.