बरेच दिवसांपासून सिनेसृष्टीत चर्चा सुरु आहे ती म्हणजे सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा प्रियकर झहीर इक्बालबरोबर लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल अखेर आता २३ जून २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. या जोडप्याने अलीकडेच त्यांची बॅचलर पार्टीही अगदी थाटामाटात साजरी केलेली पाहायला मिळाली. या सगळ्यादरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरत आहेत की सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा तिच्या अचानक लग्नाच्या प्लॅनिंगमुळे नाराज आहेत आणि ते कदाचित आपल्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत. (Sonakshi Sinha Wedding)
अशातच आता शत्रुघ्न सिन्हा यांनी या सर्व अफवांवर मौन सोडले असून चर्चेत असलेल्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्याबाबतही भाष्य केलं आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित न राहण्यावरुन सुरु असलेल्या वादाबद्दल खुलासा केला.
राजकारणात सक्रिय असलेल्या या अभिनेत्याने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आणि सांगितले की, त्याला आपल्या मुलीचा खूप अभिमान आहे आणि त्यांचा आनंद तिच्या आनंदात आहे. लग्नातल्या उपस्थितीतीबाबत बोलताना शत्रुघ्न म्हणाले की, “हे कोणाचे आयुष्य आहे?. हे फक्त माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचे आयुष्य आहे. ज्याचा मला खूप अभिमान आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती मला तिच्या शक्तीचा आधारस्तंभ म्हणते. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नक्कीच उपस्थित राहीन. मी का असू नये आणि मी का नसावे?. तिचा आनंद हाच माझा आनंद आणि माझा आनंद हाच तिचा आनंद. तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे”.
दरम्यान, काल १९ जून रोजी सोनाक्षी व झहीर यांचा संगीत सोहळा आहे. तर आज त्यांचा हळदी सोहळा पार पडणार आहे. तसेच २२ जूनला त्यांचा साखरपुडा होणार असून त्यानंतर २३ जून रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.