अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमी चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या मालिकेदरम्यान सहकलाकार सुशांत सिंह राजपूतबरोबर चांगली मैत्री झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्याही प्रेमाची चर्चा सर्वत्र होत असे. एका कार्यक्रमादरम्यान सुशांतने अंकिताला लग्नाची मागणीदेखील घातली होती. दोघांचे सर्व व्यवस्थित सुरु असतानाच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यादेखील समोर आल्या. काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले व अभिनय क्षेत्रात आपली वेगळी जागा निर्माण केली. (ankita lokhande on sushant singh rajput )
सुशांत चित्रपटांमध्ये काम करुन बॉलिवूडमध्ये आपले वेगळे अस्तित्त्व निर्माण केले. तसेच अंकितादेखील मालिकाविश्वात व चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावत होती. अशातच ४ वर्षांपूर्वी सुशांतने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. सुशांतचा मृतदेह वांद्रे येथील घरात लटकलेला मिळाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला . मात्र यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. आज त्याची चौथी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अंकिताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अंकिता खूपच भावूक झाल्याचे दिसून येत आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर सुशांतचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुशांत त्याचा श्वान स्कॉचबरोबर उभा असलेला दिसत आहे. गेल्या वर्षी सुशांतच्या श्वानाचेही निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. अंकिताने केलेल्या पोस्टमुळे ती आजही सुशांतला विसरले नसल्याचे दिसून येत आहे. त्याच्या मृत्यूच्या वेळीही अंकिता पूर्णपणे खचलेली दिसून आली होती. तसेच तिने अनेकदा सुशांतच्या मृत्यूचा योग्यरित्या तपास व्हायला हवा अशी विनंतीही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. आता तिने केलेल्या पोस्टमुळे सुशांतच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
अंकिता व्यतिरिक्त ‘बिग बॉस १७’ चा उपविजेता अभिषेक कुमारनेही सुशांतसाठी श्रद्धांजलीची पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “आजपर्यंत तुला कोणीही विसरु शकले नाही”. सुशांत हा अभिषेकसाठी नेहमी प्रेरणादायी मानत आला आहे.