गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला चार वर्ष झाल्यानंतर अंकिता लोखंडेची पोस्ट, शेअर केला त्याचा फोटो, अजूनही आठवणीत रमते कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 14, 2024 | 5:23 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
ankita lokhande on sushant singh rajput

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला चार वर्ष झाल्यानंतर अंकिता लोखंडेची पोस्ट, शेअर केला त्याचा फोटो, अजूनही आठवणीत रमते कारण…

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमी चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या मालिकेदरम्यान सहकलाकार सुशांत सिंह राजपूतबरोबर चांगली मैत्री झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्याही प्रेमाची चर्चा सर्वत्र होत असे. एका कार्यक्रमादरम्यान सुशांतने अंकिताला लग्नाची मागणीदेखील घातली होती. दोघांचे सर्व व्यवस्थित सुरु असतानाच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यादेखील समोर आल्या. काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले व अभिनय क्षेत्रात आपली वेगळी जागा निर्माण केली. (ankita lokhande on sushant singh rajput )

सुशांत चित्रपटांमध्ये काम करुन बॉलिवूडमध्ये आपले वेगळे अस्तित्त्व निर्माण केले. तसेच अंकितादेखील मालिकाविश्वात व चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावत होती. अशातच ४ वर्षांपूर्वी सुशांतने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. सुशांतचा मृतदेह वांद्रे येथील घरात लटकलेला मिळाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला . मात्र यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. आज त्याची चौथी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा- Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या गावातील घरावर चढले तिचेच दोन्ही पाळीव श्वान, खेळत राहिले अन्…; कमेंट करणारीला दिलं सडेतोड उत्तर

अंकिताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अंकिता खूपच भावूक झाल्याचे दिसून येत आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर सुशांतचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुशांत त्याचा श्वान स्कॉचबरोबर उभा असलेला दिसत आहे. गेल्या वर्षी सुशांतच्या श्वानाचेही निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. अंकिताने केलेल्या पोस्टमुळे ती आजही सुशांतला विसरले नसल्याचे दिसून येत आहे. त्याच्या मृत्यूच्या वेळीही अंकिता पूर्णपणे खचलेली दिसून आली होती. तसेच तिने अनेकदा सुशांतच्या मृत्यूचा योग्यरित्या तपास व्हायला हवा अशी विनंतीही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. आता तिने केलेल्या पोस्टमुळे सुशांतच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी अक्षरा-अधिपतीचा कुटुंबियांनीच सजवला बेड, भुवनेश्वरी मात्र दोघांना विभक्त करण्याच्या तयारीत, काय होईल परिणाम

अंकिता व्यतिरिक्त ‘बिग बॉस १७’ चा उपविजेता अभिषेक कुमारनेही सुशांतसाठी श्रद्धांजलीची पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “आजपर्यंत तुला कोणीही विसरु शकले नाही”. सुशांत हा अभिषेकसाठी नेहमी प्रेरणादायी मानत आला आहे.

Tags: ankita lokhandedeath anniversarysushant singh rajput
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Shashank Ketkar On BMC

शशांक केतकरने फिल्मसिटीबाहेरील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMCने घेतली दखल, स्वच्छ केला परिसर, म्हणाला, "तातडीने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.