आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून ही जोडी लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मुग्धा व प्रथमेशच्या परदेशात गेले असून सोशल मीडियावर त्यांनी आपले खास फोटो शेअर केले आहेत.
मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाला आता पाच महिने पूर्ण झाले असून दोघं आता नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत. आपल्या गाण्याच्या कार्यक्रमांमधून वेळ काढत हे दोघे नेपाळमध्ये गेले आहेत. दोघे नेपाळच्या भक्तपूरमध्ये भटकंती करत असून याचे खास फोटो प्रथमेश त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत. अशातच आता या दोघांनी त्यांच्या देवदर्शनाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याबरोबरच त्यांनी त्यांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. यांमध्ये दोघांचा मॉडर्न लूकही पाहायला मिळत आहे. ‘नेपाळ डायरी’ असं म्हणत मुग्धा-प्रथमेश यांनी हे खास फोटो शेअर केले आहेत.

पशुपतीनाथ इथे मुग्धा-प्रथमेश देवदर्शन करत असून याचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. मुग्धा-प्रथमेश यांनी नेपाळमधील मनाकमना, पोखरा फेवा लेक, फिश्तैल, गुप्तेश्वैर महादेव केव्ह अशा ठिकाणी भ्रमंती केली असून याची खास झलक त्यांने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
दरम्यान, ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या आणि २१ डिसेंबरला त्यांनी लग्नगाठ बांधून त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.