बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अस्तिकट्यार मिळवण्यात देवीआईच्या लेकींना यश मिळणार का?, राजाध्यक्ष कुटुंबियांना वाचवण्यासाठी काय असणार नेत्रा व इंद्राणीची नवीन खेळी

Saurabh Moreby Saurabh More
जून 13, 2024 | 9:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Rupali Worries as the Divine Dagger Disappears

अस्तिकट्यार मिळवण्यात देवीआईच्या लेकींना यश मिळणार का?, राजाध्यक्ष कुटुंबियांना वाचवण्यासाठी काय असणार नेत्रा व इंद्राणीचा नवीन खेळी

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश केल्यानंतर ती विरोचक नसून रुपालीसारखे वागत असल्याने सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे, अशातच नेत्राला विरोचकापासून कुटुंबियांना काही धोका निर्माण होणार नाही ना? याची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे त्याने घरच्यांना काही करु नये यासाठी नेत्रा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अद्वैत नेत्राला विरोचकापासून काहीही कुणालाच काही धोका नसल्याचे सांगतो. तेव्हा नेत्राही विरोचकाला त्याच्याच जाळ्यात अडकवण्याचे सांगते. यावेळी नेत्रा अद्वैतला असं म्हणते की आपण हे मान्य करुयात की, विरोचक हा विरोचक नसून ती रुपाली राजाध्यक्षच आहे असं समजून तिला गाफील ठेवायचं आणि मग  तिच्याकडून अस्तिकट्यार मिळवायची.

यापुढे शेखर इंद्राणीकडे नेत्राच्याअ बाळाची काळजी व्यक्त करतात, विरोचकाने जे फाल्गुनीबरोबर केले तेच त्याने नेत्राबरोबर करु नये यासाठी त्या दोघांना विरोचकापासून लांब ठेवण्याविषयी सांगतात. त्यामुळे इंद्राणीने नेत्राला हे सांगावं की तिने इथून कुठे तरी लांब जावे, असं सांगण्याची विनंती करतात. यावेळी इंद्राणी नऊ महिने नेत्राला घरापासून लांब ठेवणे शक्य नसल्याचे सांगते. त्यानंतर रुपालीदेखील कट्यार नष्ट होईपर्यंत मला हे असंच वागावं लागेल असं म्हणत असते.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – मेष, मिथुन व तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस खूपच खास, प्रत्येक कामात यश मिळेल, आरोग्यही चांगले राहील, जाणून घ्या…

यापुढे नेत्राला घरातल्या सर्वांना विरोचकाच्या मनाप्रमाणे सर्वांनी वागावे असं म्हणते. कारण त्याला अशीच माणसे आवडतात. विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर विरोचकही विश्वास ठेवतो. यामुळे विरोचक घरात राहील आणि त्यामुळे अस्तिकट्टयार  मिळू शकेल असं म्हणते. त्यानंतर रुपाली अस्तिकट्यारच्याअ शोधात  जाते. आणि ती अस्तिकट्यार रुपाली जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करते. मात्र तिच्याकडून ते साध्य होत नाही.

आणखी वाचा – “ही मुलगी डोक्यात जाते”, मायरा वायकुळच्या व्हिडीओवर नको नको त्या कमेंट, खरंच ट्रोल करणाऱ्यांना हे शोभतं का?

त्यामुळे आता पुढील भागात विरोचकाने अस्तिकट्यार नष्ट केली आहे की नाही. हे पाहायला मिळणार असून विरोचक घराच्या बाहेर जाऊन काहीतरी करत असल्याची शंका नेत्रा व इंद्राणीच्य लेकींना आली आहे. त्यामुळे नेत्रा व इंद्राणी रुपालीचा खरा चेहरा ओळखणार का? की त्याच्याच जाळ्यात अडकणार हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
paaru Serial Update

अहिल्यादेवींना मान्य असणार का पारू-आदित्यचं नातं?, गुरुजींनी केलेलं भाकीत ठरणार का खरं?, मालिकेत नवा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.