शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर फिरायला गेल्यावर मुग्धा-प्रथमेश यांचे देवदर्शन, महादेवाच्या मंदिरातही गेले, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जून 13, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saregamapa fame Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate shared photos of taking the blessings of the gods in Nepal

लग्नानंतर फिरायला गेल्यावर मुग्धा-प्रथमेश यांचे देवदर्शन, महादेवाच्या मंदिरातही गेले, फोटो व्हायरल

आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून ही जोडी लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मुग्धा व प्रथमेशच्या परदेशात गेले असून सोशल मीडियावर त्यांनी आपले खास फोटो शेअर केले आहेत.

मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाला आता पाच महिने पूर्ण झाले असून दोघं आता नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत. आपल्या गाण्याच्या कार्यक्रमांमधून वेळ काढत हे दोघे नेपाळमध्ये गेले आहेत. दोघे नेपाळच्या भक्तपूरमध्ये भटकंती करत असून याचे खास फोटो प्रथमेश त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत. अशातच आता या दोघांनी त्यांच्या देवदर्शनाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याबरोबरच त्यांनी त्यांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. यांमध्ये दोघांचा मॉडर्न लूकही पाहायला मिळत आहे. ‘नेपाळ डायरी’ असं म्हणत मुग्धा-प्रथमेश यांनी हे खास फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – अस्तिकट्यार मिळवण्यात देवीआईच्या लेकींना यश मिळणार का?, राजाध्यक्ष कुटुंबियांना वाचवण्यासाठी काय असणार नेत्रा व इंद्राणीची नवीन खेळी

पशुपतीनाथ इथे मुग्धा-प्रथमेश देवदर्शन करत असून याचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. मुग्धा-प्रथमेश यांनी नेपाळमधील मनाकमना, पोखरा फेवा लेक, फिश्तैल, गुप्तेश्वैर महादेव केव्ह अशा ठिकाणी भ्रमंती केली असून याची खास झलक त्यांने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

आणखी वाचा – मेष, मिथुन व तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस खूपच खास, प्रत्येक कामात यश मिळेल, आरोग्यही चांगले राहील, जाणून घ्या…

दरम्यान, ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या आणि २१ डिसेंबरला त्यांनी लग्नगाठ बांधून त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

Tags: marathi entertainment newsmugdha vaishampayanprathamesh laghate
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

मे 23, 2025 | 12:35 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

साक्षीने डाव पलटवला, प्रेस कॉन्फरन्स घेत अर्जुन-चैतन्यला शिकवला धडा, दोघांनाही बसलाय जबर धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.