मराठी सिने विश्वात अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या अदाकारी, सौंदर्यासाठी ओळखल्या जातात या अभिनेत्रींचे काही खास फोटो सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय होतात त्यांचा चाहता वर्गही या फोटोंवर भरभरून कमेंट करत त्यांचे कौतुक करत असतो सुंदर सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर अशा अनेक अभिनेत्रींच्या यादीत एका नावाची अजून भर पडताना दिसत आहे ती म्हणजे अभिनेत्री अश्विनी कासार. (Ashvini Kasar Bold Photoshoot)

अश्विनीने याआधी बरेच फोटोशूट चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत तिच्या मोहक अदांनी तिचे हे नवनवीन फोटोशूट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. अशातच अश्विनीचा आणखी एक फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. अश्विनीने घागरा चोळीमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे ते फोटोशूट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पहा अश्विनीच्या फोटोंवरील कमेंट (Ashvini Kasar Bold Photoshoot)
अश्विनीचा बोल्ड अंदाज सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवतोय. अश्विनीच्या या फोटोंवर अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने हार्ट ईमोजी पाठवत कमेंट केली आहे. त्यासोबत चाहत्यांनीही अश्विनीच्या या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

‘कमला’, ‘कट्टी बट्टी’, ‘सावित्रीज्योती’ या सारख्या मालिकेतून अश्विनीने छोटा पडदा गाजवला. आपल्या अभिनयाने सर्वांना आपलंसं करून घेणारी अभिनेत्री अश्विनी कासार खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बिनधास्त आणि स्टायलिश आहे. तिचा हा बिनधास्तपणा आपल्याला येत्या १ मे पासून ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत पाहायला मिळणार आहे.(Ashvini Kasar Bold Photoshoot)
अश्विनी सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असते. अश्विनीने आजवर मालिकांमधून चाहत्यांच्या मनावर राज्य केलेच आहे. त्यासोबतच अश्विनी तिच्या मोहक अदांनी नवनवीन फोटोशूट करून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. नुकतंच तिने पाण्यामध्ये भिजत केलेलं साडीतील फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडलं. या फोटोंदरम्यान अश्विनीच सौंदर्य अधीकच खुललं होत.
