महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनय कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. याच बरोबर प्राजक्ता सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. (Prajakta Mali Boss Lady)
प्राजक्ता तिच्या फोटोशूटचे फोटोज सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. याच बरोबर प्राजक्ताच्या पोस्टचे कॅप्शन सुद्धा खूप आकर्षक असतात. प्राजक्ताने नुकतेच तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Prajakta Mali Boss Lady)
या फोटोंमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. आणि या लूकवर तिने कानात ओक्सीटचे एयररिंग्स घातले आहेत. या सिम्पल लूकमध्ये प्राजक्ता सुंदर दिसते आहे. या पोस्टवर प्राजक्ताने Blessed is the women who chases no one, Needs no validation and handles her business like a boss , Ohh I am the blessed one असे कॅप्शन दिले आहे.
हे देखील वाचा: लक्ष्मीच्या तोंडून शिवी ऐकून जयदीपचा राग अनावर! जयदीपचा राग अनावर!
तिच्या या पोस्टवर “मंगेश पाडगांवकरांची प्राजक्ताची फुले ही कविता जणू त्यांनी तुझ्याच साठी लिहली असावी” तसेच “तेरे चेहरे से नजर नही हटती नजारे हम क्या देखे” आणि “ये चांद सा रोशन चेहरा ज़ुल्फ़ों का रंग सुनहराये झील सी नीली आँखें कोई राज़ है इनमें गहरा तारीफ़ करूँ क्या उसकी जिसने तुम्हें बनाया” अश्या छान कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. (Prajakta Mali Boss Lady)
हे देखील वाचा: वर्कआऊट च्या व्हिडिओ वर जान्हवी होतेय ट्रोल
प्राजक्ताने तिच्या करियरची सुरुवात स्टार प्रवाह पासून जरी केली असली तिला खरी प्रसिद्धी जुळून येती रेशीमगाठी मध्ये मेघना या भूमिकेत दिसली होती. तसेच प्राजक्ता आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात होस्टिंग करताना दिसत आहे. याच बरोबर प्राजक्ताचे स्वतःचे “प्राजक्तराज” नावाचं ज्वेलरी ब्रँड आहे. याच बरोबर प्राजक्ता मनसे या पक्षाला पाठींबा देत त्यांच्यासाठी काही कार्य देखील करताना दिसते. “प्राजक्तराज” या तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या उदघाटनासाठी स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्नी सह उपस्थिती दाखवली होती.