सध्या आपल्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी अनेक ऐतिहासिक विषय, सामाजिक विषय मांडणारे चित्रपट निर्माण करण्यात येत आहेत. अशातच आणखी एका महान व्यक्तिमत्वाची गाथा मांडणारा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लोक चळवळीतील आघाडीचं नाव म्हणजे महाराष्ट्र शाहीर असा लौकिक असणारे कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे. शाहीर यांचं समाज प्रबोधनात असलेलं योगदान त्यांची समाज प्रतीची तळमळ जनसामन्यानं पर्यंत पोहचवण्यासाठी या चित्रपटाची निर्मती करण्यात येत असल्याचं दिगदर्शक आणि शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी सांगितले आहे.(Maharashtra Shair Trailer Launch)
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. त्या वेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले. त्या वेळी चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यांनी सांगितलं कि चित्रपट लोकांपर्यंत पोहचवा यासाठी शासनाकडून आवश्यक असणारी योग्य ती मदत केली जाईल असं आश्वासन या वेळी केदार शिंदे याना दिले तर. आपल मनोगत मांडताना उदय सामंत चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांना म्हणाले तुम्ही पैसे वाटता असं कळलं मग तुम्ही माझ्या कडे ही लक्ष द्या मी अभिनेता नाही पण राजकारणी आहे निवडणूक लढवतो उदय सामंत यांचं हे वाक्य ऐकून एकच हशा पिकला.
पुढे आपल्या भाषणात ते म्हणाले मुखमंत्र्यांशी चर्चा करून पाठयपुस्तकात सुद्धा शाहीर साबळे यांच्या बद्दल आभ्यासक्रम यावा या बद्दल विचार करू. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या गाण्यांनंतर आता चित्रपटाच्या ट्रेलरला ही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळतोय.(Maharashtra Shair Trailer Launch)