बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान व अमृता सिंह यांचे नाते सुरुवातीपासूनच खूप चर्चेत राहिले आहे. घटस्फोट होऊन आता २० वर्ष उलटून गेली आहेत. त्यांची मुलं सारा व ईब्राहिम हे दोघेही आता आई अमृताकडेच राहत आहेत. मुलगी साराने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तर ईब्राहिमदेखील अभिनय करताना दिसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ईब्राहिम हा अभिनी किंवा आगामी चित्रपटामुळे नाही तर अन्य विविध कारणामुळे चर्चेत असतो. अशातच आता त्याच्याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे. (ibrahim khan drunk video )
कोणत्याही चित्रपटांमध्ये नसतानाही ईब्राहीमबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु असतात. आशातच आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. मॉडेल असलेल्या तानिया श्रॉफच्या घरी ७ जून रोजी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीसाठी सुहाना खान, अनन्या पांडे, उर्फी जावेद, ऑरी यांसहित अनेक कलकार उपस्थित होते. यामध्ये ईब्राहिमही उपस्थित होता. यादरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो नशेत असल्याचे सगळेजण म्हणत आहेत.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ईब्राहिमचा तोल जाताना दिसत आहे. पार्टीमधून बाहेर निघताना तो पापाराजीना सॉरी असे बोलतानाही दिसत आहे. त्याचे डोळे लाल झाले असून त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबरोबरच या व्हिडीओमध्ये तो पार्टीमधून बाहेर येट असताना तो पडतानादेखील दिसत आहे. मात्र स्वतःला सावरत तो त्याच्या गाडीजवळ जातो आणि गाडीचा स्वतः दरवाजा उघडून बसतो व निघून जातो.
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, “अरे, कीती मोठा अपघात झाला”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “हा नशेत आहे बाकी काही नाही. तो एकदम ठीक आहे”.
ईब्राहिमच्या कामाबद्दल सॅनगायचे झाले तर तो अभिनेता म्हणून समोर आला नाही. मात्र त्याने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सध्या तो चित्रपटासाठी स्वतःला तयार करत आहे. तसेच आई-वाडिलांकडून अभिनयाचे धडेदेखील घेत आहे.