सारेगमप लिटिल चॅम्प्स या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून प्रसिद्धी झोतात आलेले लोकप्रिय गायक व गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे ही मराठी संगीत विश्वातील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी आहे. त्यांच्या लग्नानंतर हे दोघे बरेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले. आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची माहिती असो, गाण्याचे व्हिडीओ असो किंवा अगदी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी असो, हे दोघेही सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मुग्धा व प्रथमेश हे दोघे एकत्र त्यांच्या महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही नेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करत असतात. याबद्दलची माहितीही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.

अशातच त्यांच्या व्यस्त वेळातून व गायनाच्या कार्यक्रमांमधून वेळ काढत हे दोघे बाहेर फिरायला गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दलची महिती दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दिली आहे. मुग्धाने काल मुंबई विमानतळावरील कॉफी मगचा फोटो शेअर करत खूप गरजेचा व खूप दिवसांपासून वाट बघत असलेल्या प्रवासाला जात असल्याचे म्हटले होते. मात्र यातून हे दोघे कुठे जात होत याबद्दल सांगितले नव्हते.

आणखी वाचा – साक्षीच्या मोबाईलमधून चैतन्यला महीपतचा नंबर मिळणार का?, यामुळे साक्षीला चैतन्यचा संशय येणार का?
अशातच प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमधून हे दोघे हिमालयात गेले असल्याचे कळत आहे. प्रथमेशने मुग्धाबरोबरचा त्याचा एक सेल्फी फोटो व पासपोर्टचे फोटो शेअर केले असून त्याने विमानातून बाहेरचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. विमानाच्या खिडकीतून दिसणारे हिमालय असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सततच्या गाण्याच्या कार्यक्रमातून ब्रेक घेत फिरायला गेले आहेत की. इथेही त्यांच्या गाण्याचा काही खास कार्यक्रम आहे. याबद्दल अजून काही कळू शकलेले नाही. दरम्यान, ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत.