बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर फिरायला गेले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, विमानातील फोटो शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “हिमालय दिसतोय आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 8, 2024 | 11:06 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prathamesh Laghate and Mugdha Vaishampayan on travel and they shared a special video of the Himalayas seen from the plane window

लग्नानंतर फिरायला गेले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, विमानातील फोटो शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, "हिमालय दिसतोय आणि…"

सारेगमप लिटिल चॅम्प्स या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून प्रसिद्धी झोतात आलेले लोकप्रिय गायक व गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे ही मराठी संगीत विश्वातील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी आहे. त्यांच्या लग्नानंतर हे दोघे बरेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले. आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.   

त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची माहिती असो, गाण्याचे व्हिडीओ असो किंवा अगदी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी असो, हे दोघेही सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मुग्धा व प्रथमेश हे दोघे एकत्र त्यांच्या महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही नेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करत असतात. याबद्दलची माहितीही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.

अशातच त्यांच्या व्यस्त वेळातून व गायनाच्या कार्यक्रमांमधून वेळ काढत हे दोघे बाहेर फिरायला गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दलची महिती दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दिली आहे. मुग्धाने काल मुंबई विमानतळावरील कॉफी मगचा फोटो शेअर करत खूप गरजेचा व खूप दिवसांपासून वाट बघत असलेल्या प्रवासाला जात असल्याचे म्हटले होते. मात्र यातून हे दोघे कुठे जात होत याबद्दल सांगितले नव्हते.

आणखी वाचा – साक्षीच्या मोबाईलमधून चैतन्यला महीपतचा नंबर मिळणार का?, यामुळे साक्षीला चैतन्यचा संशय येणार का?  

अशातच प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमधून हे दोघे हिमालयात गेले असल्याचे कळत आहे. प्रथमेशने मुग्धाबरोबरचा त्याचा एक सेल्फी फोटो व पासपोर्टचे फोटो शेअर  केले असून त्याने विमानातून बाहेरचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. विमानाच्या खिडकीतून दिसणारे हिमालय असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील राहत्या घरी मोठी चोरी, सांगितली घटना, म्हणाली, “१० तोळे सोनं, पैसे गेले आणि…”

मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सततच्या गाण्याच्या कार्यक्रमातून ब्रेक घेत फिरायला गेले आहेत की. इथेही त्यांच्या गाण्याचा काही खास कार्यक्रम आहे. याबद्दल अजून काही कळू शकलेले नाही. दरम्यान, ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत.

Tags: marathi entertainment newsmugdha vaishampayanprathamesh laghate
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post

"मी रत्नागिरीमध्ये असताना त्यांचं निधन झालं अन्…", सासूबाईंबाबत बोलताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला कोसळलं रडू, म्हणाली, "रात्री दीड वाजता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.