‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. या मालिकेतील अर्जुन व सायलीच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. अर्जुन ही भूमिका मालिकेत अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे. तर सायलीच्या भूमिकेत अभिनेत्री जुई गडकरी पाहायला मिळत आहे. अमितच्या अर्जुन या पात्रामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (amit bhanushali son video)
सोशल मीडियावरही अमित बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. बरेचदा अमितचे सोशल मीडियावरील ट्रेंडिंग रील व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतात. अमितला हृदान नावाचा मुलगा आहे. त्याचं आणि हृदानचं सुंदर बॉण्डिंग नेहमीच त्यांच्या चाहत्यांना भारावून टाकतं. अशातच, अमितच्या मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमित भानुशालीची पत्नी श्रद्धा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या लेकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये याच्या मनात काय आलं कळलं नाही आणि हा अचानक गायला लागला”, असं कॅप्शन देत हृदानचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमितचा लेक डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं गाताना दिसत आहे. आणि त्यावर तो डान्सदेखील करत आहे.
हृदानचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडीओवर चाहतेमंडळी भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. “हा खूप गोड आहे…मोठा झाल्यावर हुबेहूब अमितसारखा दिसेल”, “गोड…मी तुमच्या दोघांची खूप मोठी चाहती आहे”, “किती गोड आहे”, असं म्हणत कौतुक केलं आहे. गेली अनेक वर्ष मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अमित ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सध्या मालिकेत अर्जुन-सायलीने साक्षीचा पर्दाफाश केलेला पाहायला मिळत आहे.