भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खुप चर्चेत आहे. हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. काही दिवसांतच नताशालाही तिच्या मित्राबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहण्यात आले. त्यामुळे त्यावर अधिक चर्चा निर्माण झाली. पण यावर हार्दिक व नताशा कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. पण दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांचा तीन वर्षाचा मुलगा नक्की कोणाकडे राहणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावरुनदेखील अनेक अंदाज बांधले जात आहेत. (hardik pandya son)
हार्दिक व नताशा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येताच हार्दिकच्या संपत्तीबद्दलही चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर आता त्यांचा तीन वर्षाचा मुलगा अगस्त्य घटस्फोटानंतर नक्की कोणाकडे राहणार? असे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. जेव्हापासून दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या तेव्हापासून अगस्त्य हा त्याचे काका हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याबरोबर वेळ घालवताना दिसून आला. कृणालने काही दिवसांपूर्वी अगस्त्यबरोबर फोटो शेअर केले आहेत.
त्यानंतर कृणालने व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. यामध्ये तो अगस्त्यबरोबर धमाल मस्ती करताना दिसत आहेत.तसेच त्याची पत्नी पंखुडीदेखील मुलांबरोबर मस्ती करताना दिसत आहे. हे व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “हार्दिक व नताशा घटस्फोट घेणार असतील म्हणून कृणाल व पंखुडी अगस्त्यची काळजी घेत आहेत”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “मुलगा पहिल्यांदाच कृणाल व पंखुडी यांच्या घरी आहे नाहीतर तो नेहमीच नताशाजवळच असतो”.
जेव्हापासून नताशाने तिच्या नावासमोरील पांड्या हे आडनाव काढले तेव्हापासून त्यांच्यामध्ये दुरावा आल्याचे समोर आले. तेव्हापासूनच नताशा व हार्दिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाना उधाण आले. तसेच ती आयपीएल सामन्यांना देखील नताशा दिसली नव्हती. हार्दिक व नताशाने खूप काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०२० साली लग्नबंधनात अडकली. तसेच गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.