शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लेकाने शशांक केतकरची ‘ती’ वस्तू चक्क खिडकीबाहेर फेकून दिली अन्… व्हिडीओ शेअर करत दाखवली मुलाची करामत  

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 29, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shashank ketkar on son

Video : लेकाने शशांक केतकरची ‘ती’ वस्तू चक्क खिडकीबाहेर फेकून दिली अन्... व्हिडीओ शेअर करत दाखवली मुलाची करामत  

‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून शशांक केतकर अधिक प्रकाशझोतात आली. या मालिकेमध्ये त्याने श्री ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. घराघरात त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. शशांकने आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेमध्ये दिसून येत आहे. अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांची नेहमी संवाद साधत असतो. अनेक व्हिडीओ तसेच फोटो तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. (shashank ketkar on son)

शशांक २०१७ साली प्रियंका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला. त्याला ऋग्वेद नावाचा मुलगा आहे. शशांक त्याच्या मुलाबरोबर धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो.नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या मुलाचे प्रताप सांगत आहे. तो या व्हिडीओमध्ये घरात मुलं असण्याची लक्षण सांगत आहे. तो या व्हिडीओमध्ये सांगत आहे की, “घरात लहान मुलं असण्याची टिपिकल लक्षण! मी सकाळपासून माझे इयरफोन शोधत होतो. घरभर शोधले पण मिळाले नाहीत. मी इयरफोन ऑर्डरदेखील करणार होतो. मात्र तेवढ्यात माझी नजर खिडकीत गेली आणि वाकून पाहिले असता इयरफोन खाली पडलेले दिसून आले. ऋग्वेदची काही खेळणी व माझे इयरफोन खाली पडले आहेत”.

आणखी वाचा – ‘दंगल’ फेम झायरा वसीमच्या वडिलांचे निधन, अभिनेत्रीला दुःख अनावर, म्हणाली, “अल्लाहकडे प्रार्थना करा की…”

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

सदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याने, “आय लव्ह यु ऋग्वेद. पण माझे इयरफोन्स का आणि कुठे टाकलेस?” असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये शशांकचा मजेशीर अंदाज बघायला मिळत आहे. तसेच त्याच्या व्हिडीओला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळत आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – एअरपोर्टवर कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, भावुक झाल्या अन्…; ‘कान्स’नंतर भारतात परतल्या छाया कदम, म्हणाल्या, “आता चिकन-भाकरी…”

एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “बाललीला किती मजेशीर असतात. इतके होऊनही तुझा शांतपणा, सहनशीलता खरच कौतुकास्पद आहे. एखाद्या बाळावर आई-वडील किती रागावले असते”, दुसरा नेटकरी लिहितो की, “ही तर आताशी सुरुवात आहे”. शशांकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका करताना दिसत आहे.   

Tags: shashank ketkarsonvideo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Appi Amchi Collector Promo

अर्जुन नवा संसार थाटण्याच्या तयारीत, अप्पीलाही साखरपुड्याचं आमंत्रण, अमोलही पुन्हा त्याच्या बाबांपासून दूर होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.