‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता दत्तू मोरे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही दत्तू बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच दत्तू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दत्तूने गेल्या वर्षी पेशाने डॉक्टर असणाऱ्या स्वाती हिच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नामुळे दत्तू बराच चर्चेत आला होता. दत्तूच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दत्तूने बायकोला हटके शुभेच्छा देत शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हेतर यानंतरच्या दत्तूच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Dattu More Answers to Netizens)
दत्तू व स्वाती यांनी २३ मे २०२३ रोजी गुपचुप पद्धतीने एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली होती. कोर्ट मॅरेज पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं. त्याच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. दत्तूच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
“लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असेच छान एकत्र राहु आणि एकमेकांना सांभाळून घेत जाऊ. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत उम्म्म्मम गिफ्ट.?, लवकरच…” असं म्हणत त्याने बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टनंतर आता दत्तूने त्याच्या बायकोने सरप्राईज गिफ्ट दिल्याचाही व्हिडीओ शेअर केला आहे. दत्तू मोरेला त्याच्या बायकोने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास महागडी अशी बाईक गिफ्ट केली आहे. शोरूम मध्ये बाईकबरोबरचा त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हे सरप्राईज गिफ्ट पाहून दत्तू खूपच खुश दिसत होता.

दत्तूच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. या पोस्टला अनेकांनी पसंती दर्शवलेली पाहायला मिळत असताना नेटकऱ्यांच्या एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नेटकऱ्याच्या कमेंटवर दत्तूने ही उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्याने कमेंट करत “भाऊ राग नका येऊ देऊ पण तुमचे त्या गाडीपर्यंत पाय पुरतात का?”, असं म्हटलं आहे. यावर दत्तूने कमेंट करत, “म्हणूनच ही गाडी घेतली”, असं उत्तर दिलं आहे.