बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ईशा-अनिशचाही घटस्फोट होणार, विचित्र वागल्यानंतर अरुंधतीने मुलगी म्हणण्यासही दिला नकार, आणखी एक संसार मोडणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 24, 2024 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Promo

ईशा-अनिशचाही घटस्फोट होणार, विचित्र वागल्यानंतर अरुंधतीने मुलगी म्हणण्यासही दिला नकार, आणखी एक संसार मोडणार

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेच्या रंजक कथानकाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूने अरुंधतीच आयुष्य बदललेलं पाहायला मिळत आहे. तर सुलेखा ताईंनीं पाठ फिरवल्याने अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला येते. मात्र देशमुखांच्या घरी अरुंधतीच राहणं संजनाला पटत नाही. संजनाच्या सततच्या या त्रासाला कंटाळत अरुंधती दुसरं घर घेते आणि तिकडे राहायला जाते. (Aai Kuthe Kay Karte Promo)

तर इकडे संजनानंतर अरुंधतीचा राग राग तिची लेक इशाही करते. इशाही आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरते. आणि तिचा राग राग करते. तर घरात यश व आरोहीच लग्न झालेलं असतं. देशमुखांच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. यश व आरोहीच्या लग्नाला इशा देशमुखांच्या घरी आलेली असते. त्यादरम्यान इशाची अंगठी हरवते. इशा अंगठी चोरल्याचा आरोप नव्या नवरीवर म्हणजेच आरोहीवर लावते.

आणखी वाचा – Video : बायकोने दत्तू मोरेला गिफ्ट केली महागडी बाईक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

मात्र आरोहीने ती अंगठी चोरलेली नसते हे सिद्ध व्हायचं बाकी असतं म्हणून अरुंधती व अनिशच्या सांगण्यावरूनही इशा आरोहीची माफी मागत नाही. इशा माफी मागत नाही हे लक्षात येताच अनिश तिला सांगतो ज्या दिवशी हे सिद्ध होईल तेव्हा तू नाक घासून आरोहीची माफी मागायची. यानंतर अंगठी सापडते आणि अरुंधती आरोहीची माफी मागायला लावते. तर अनिश इशाला थांबवतो आणि आरोहीची नाक घासून माफी मागायला लावतो.

आणखी वाचा – अभिमानास्पद! अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

यानंतर आता मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सुलेखा ताई इशाला देशमुखांच्या घरी घेऊन येतात आणि सांगतात, “तुमच्या मुलीने हद्द पार केली. आशुतोषच्या मृत्यूचं भांडवल केलं” . यावर नितीन सांगतो, “इशाने त्यांचं घर हे हॉंटेड असल्याची बातमी सर्वत्र पसरवली आहे”. त्यांनतर अनिश बोलतो, “अरुंधती मॅम मी इशाला घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला आहे”. यावर अरुंधतीच्याही डोळ्यात पाणी येत, अरुंधती इशाला बोलते, “तू माझी मुलगी असल्याची मला लाज वाटत आहे”.

Tags: aai kuthe kay karteAai kuthe kay karte promoentertainmentmarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial Netra gets a clue but in this she sees an empty temple of Goddess.

नेत्राला देवीआईचा संकेत, पाचव्या पेटीपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड, तर रुपालीला पुन्हा विरोचकाकडून नवी शक्ती मिळण्याची शक्यता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.