सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हार्दिक पांड्याचा घटस्फोट होणार?, दोघांमध्ये नेमकं असं काय घडलं?, बायको IPLमध्येही नवऱ्याला पाठिंबा देण्यासाठी नव्हती अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 24, 2024 | 1:58 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
hardik pandya and natasha natasha stevanovic relation

हार्दिक पांड्याचा घटस्फोट होणार?, दोघांमध्ये नेमकं असं काय घडलं?, बायको IPLमध्येही नवऱ्याला पाठिंबा देण्यासाठी नव्हती अन्...

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा सतत चर्चेत असतो. आयपीएल सुरु झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कारणामुळे त्याला अनेक समस्यांचा व चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्याच्या खेळावर झालेला पाहायला मिळाला. तो या वर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करु शकला नाही. पाच वेळा चॅम्पियन असणारा मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी सर्वात खालच्या स्तरावर असलेला पाहायला मिळाला. परंतु आता तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. (hardik pandya and Natasha stankovic relation)

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक व त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे समोर आले आहे. कदाचित दोघेही एकमेकांबरोबर घटस्फोट घेऊ शकतात असेही वृत्त हाती येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नताशा खूप चर्चेत आहे. आयपीएल मॅचच्या दरम्यान नताशाला ऑनलाइन धमकावण्यातदेखील आले होते. त्यामुळे तिच्याबद्दल अधिक चर्चा रंगली होती. परंतु आता हार्दिक व नताशा यांच्यामध्ये दुरावा आल्याचे समोर आले असून त्याबद्दल सर्वत्र चर्चा होत असलेली दिसून आली.

आणखी वाचा – “गाडीपर्यंत पाय पुरतात का?”, बायकोने बाईक गिफ्ट करताच दत्तू मोरेला नेटकऱ्याचा खोचक प्रश्न, अभिनेता म्हणाला, “गाडी घेतली कारण…”

View this post on Instagram

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

रेडिटवर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, “हा केवळ एक अंदाज आहे. पण हार्दिक व नताशा दोघेही एकमेकांच्या स्टोरीवर रिपोस्ट करत नाहीत. याआधी नताशाच्या इन्स्टाग्रामवर नताशा स्टेनकोविक पांड्या लिहिले होते. पण आता नताशा आडनाव हटवले आहे”.

आणखी वाचा – अभिमानास्पद! अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “हार्दिकचा ४ तारखेला वाढदिवस होता. पण नताशाने त्याच्यासाठी कोणतीही पोस्ट केली नाही. तसेच तिने सोशल मीडियावरुन हार्दिकबरोबरचे काही फोटोदेखील डिलिट केले आहेत. तसेच आयपीएल दरम्यानेही नताशाने कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये काहीही ठीक नसल्याचा अंदाज सगळ्यांनी व्यक्त केला आहे”.

या पोस्टवर हार्दिकच्या चाहत्यांनीही काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही”, “दोघांच्याही नात्यावर सध्या काहीही बोलणे चुकीचे ठरेल. पण हार्दिकने अजून फोटो डिलिट केले नाहीत. त्यामुळे कोणतेही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे”. तसेच अजून एकाने लिहिले की, “आयपीएलमध्ये हार्दिकवर लोकांचा खूप राग होता. त्यामुळे कदाचित सतर्क राहण्यासाठी नताशाने हे पाऊल उचलले आहे. देशात क्रिकेटपटूंच्या पत्नीना धमकावले जाते. त्रास दिला जातो. याआधी देखील खराब कामगिरी केल्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या पाच वर्षाच्या मुलीलादेखील त्रास दिला गेला होता”.

पण आता हार्दिक व नताशा यांच्या नात्यामध्ये खरच दुरावा आला आहे का? दोघं घटस्फोट घेणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.   

Tags: Hardik PandyaIndian cricketernatasha stencovik
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Appi Amchi Collector Promo

अर्जुनच्या वहिनीने अप्पीला पाठवले घटस्फोटाचे पेपर्स, दोघांमध्ये होणार का गैरसमज?, एकमेकांपासून दूर होणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.