लहापानापासूनच्या स्वप्नांमध्ये एखाद स्वप्न मोठेपाणी पूर्ण होत तेव्हा होणारा आनंद काहीतरी प्रत्येकासाठी एक आत्मिक सुख देणारा ठरतो. तुमच्या आमच्या सारख्याच आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याचं स्वप्न जस खरं ठराव असं वाटत तसेच एखाद्या कलाकाराला सुद्दा आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याचं स्वप्न पडू शकत आणि ते सत्यात देखील उतरू शकत. असच काहीस झालाय आपल्या सर्वांच्या लाडक्या सावत्या सोबत म्हणजेच महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून घरा घरात पोहचलेल्या सातारच्या रोहित माने सोबत.(Ashok Saraf Rohit Mane)
आपल्या गावाचा मान कसा वाढवावं याच एक उत्तम उदाहरण म्हणजे रोहित माने. रोहित माने ने त्याच्या भाषेच्या जोरावर केलेले स्किट्स प्रेक्षकांच्याच काय तर कलाकारांच्या ही चांगलेच पसंतीस उतरताना दिसले आहेत. याच सावत्याच म्हणजेच रोहितच एक स्वप्न पूर्ण झाल्याचं त्याने इंस्टाग्राम वरून शेअर केलं आहे.
हे देखील वाचा – साऊथची तारका, बाॅलीवूडमध्ये तडका….
मराठी इंडस्ट्रीतील मानाचं पान असणारे अशोक मामा याना भेटण्याचं स्वप्न उरी न बाळगणारे खूप कमी कलाकार महाराष्ट्रात दिसतील. एका कार्यक्रमा निमित्त अशोक मामा आणि रोहितची भेट झाली आणि त्याने त्यांच्या सोबतच फोटो पोस्ट करत त्याने लिहिले आहे कि अशोक सराफ यांनी त्याला ‘ माने ना रे तू’ अशी हाक मारली अणे त्याच्या चेहऱ्यावर एकच आनंद उमटलेला दिसला. तो आनंद त्याच्या मध्ये अगदी सहजतेनं दिसून येत आहे.

आपल्या अफलातून अभिनयाने रोहितने प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. हास्य जत्रेतील त्याच्या अभिनयाने तरुण वर्गात त्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. सावत्या हे नाव आज घरा घरात पोहचले आहे कारण त्या पात्राला रोहित मुळे एक वेगळी ओळख निमार्ण झाल्याचं दिसून येते. तर अशोक मामांची भेट होत हे रोहितचा काय कोणत्याही कलाकारासाठी एक पर्वणीच ठरते असं म्हणायला हरकत नाही. त्याला कारणही तसेच आहे आता पर्यंत मराठी चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी अशोक सराफ यांना मानाचा जीवन गौरव पुरस्कार देखील प्रधान करण्यात आला आहे.(Ashok Saraf Rohit Mane)