सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुका २०२४ चे मतदान देशभरात सुरु झाले आहे. हे मतदान पाच टप्प्यात होणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारदेखील निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले दिसत आहेत. वेगवेगळ्या विभागातून त्यांना उमेदवारी मिळाली असून यामध्ये कंगना रनौत, हेमा मालिनी, पवन सिंह यांचा समावेश आहे. निवडणुकांच्या आधी उमेदवारी फॉर्म भरताना स्वतःच्या मालमत्तेचा अहवाल सादर केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे. यामध्ये इतर कलाकारांची संपत्ती ही नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. (pm narendra modi property)
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणाऱ्या कंगनाला भाजपातर्फे हिमाचल येथील मंडी येथून तिकीट मिळाले आहे. नुकतेच तिने आपले निवडणुकांसाठी नामांकन दाखल केले असून तिच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. कंगनाची ९१.५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच कंगनाकडे मुंबईमध्ये सात व मंडीमध्ये एक म्हणजेच आठ बँक अकाऊंट आहेत. यामध्ये २ कोटी ५५ लाख ८६ हजार ४६८ रुपये आहेत. तसेच आईडीबीआय बँकेमध्ये दोन अकाऊंट असून एका अकाऊंटमध्ये एक कोटी सात लाख आणि दुसऱ्या अकाऊंटमध्ये २२ लाख रुपये जमा आहेत. तसेच बँक ऑफ बडोदा बँकेतील खात्यात १५,१८९,४९ रुपये जमा आहेत. मुंबईतील एचएसबीसी बँकेमद्धे तिचे १,०८,८४४,०१ रुपये व स्टँडर्ड चार्टर्ड अकाऊंटमध्ये १,५५,५०४ रुपये जमा आहेत. कंगनावर एकूण १७.३८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
अभिनेत्री हेमा मालिनी यांनादेखील मथुरा येथून उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या संपूर्ण संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये हेमा यांच्याकडे ३ कोटी ३९ लाख ३९ हजार ३०७ रुपयांचे दागिने आहेत. तसकह पती यांच्याकडेदेखील १ कोटी ७५ लाख ८ हजार २०० रुपयांचे दागिने आहेत. हेमा यांची १२ कोटी ९८ लाख २ हजार ९५१ रुपयांची संपत्ती आहे. तसेच १८ लाख ५२ हजार ८६५ रुपयांची रोख रक्कम आहे. हेमा यांच्याकडे १ अब्ज १३ कोटी ६० लाख ५१ हजार ६१० रुपयांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत.
तसेच भोजपुरी मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार पवन सिंह हे काराकाट येथून लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यांनी देखील आपल्या संपत्तीचा अहवाल दिला आहे. यामध्ये त्यांची ५ कोटी ४ लाख ९३ हजार ८१९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच १० कोटी ३१ लाख ३८ हजार ८४० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच ६० हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांची एकूण मालमत्ता २ कोटी ६० लाख १० हजार २३७ रुपये आहे. त्याचप्रमाणे ३१ लाख ४ हजार रुपयांचे दागिने आहेत. त्यांचे लखनऊ व मुंबईमध्ये ६.५ कोटी रुपयांचे फ्लॅट आहेत. पवन यांची एकूण ५ कोटी ४ लाख ९३ हजार ८१९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच १० कोटी ३१ लाख ३८ हजार ८४० रुपये जंगम मालमत्ता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील वाराणसी यथून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांनीदेखील आपल्या मालमत्तेची माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे ५२ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांचे गुजरात येथे दोन अकाऊंट असून एका अकाऊंटमध्ये ७३ हजार ३०४ रुपये जमा आहेत. तर वाराणसी येथील खात्यात केवळ सात हजार रुपये आहेत. मोदी यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २ कोटी ८५ लाख ६० हजार ३३८ रुपयांची एफडी आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ९ लाख १२ हजार रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांची एकूण ३ कोटी २ लाख ६ हजार ८८९ रुपयांची संपत्ती आहे.