‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिकाही प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकत एकामागोमाग एक रंजक वळणे येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अधिपतीची गायन शिकवणी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. तर एकीकडे भुवनेश्वरीने अधिपतील गाणं शिकवायला एक सरगम मॅडमला बोलावलं असून अधिपतीच्या आयुष्यात स्थान मिळवण्यास त्या मॅडमला सांगत आहेत आणि त्यासाठी तिला काही पैसेदेखील देतात. भुवनेश्वरीला अक्षराला अधिपतीच्या आयुष्यातून काढून टाकायचं असतं म्हणून ती हा नवा डाव आखते.
मालिकेच्या कथानकात नुकतीच त्यांच्या घरात पूजा होतानाचे पाहायला मिळाले. यावेळी पूजेच्या दरम्यान सरगम मॅडम पूजाच्या विधीवेळी सारखी अधिपतीला हात लावतानाचे पाहायला मिळाले आणि हीच गोष्ट अक्षराला खटकत आहे. दरम्यान पूजा झाल्यानंतर अधिपती-अक्षरा खोलीत जातात त्यावेळी अक्षरा अधिपतीला तिच्या एका मैत्रिणीचे उदाहरण देत सरगमविषयी बोलातानाचे दाखवण्यात आले आहे. अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे.
मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये पूजा पार पडत असतानाचे पाहायला मिळत आहे. या पूजेदरम्यान, सरगम मॅडम व अक्षराचा एकमेकांना धक्का लागतो आणि यावेळी सरगमच्या हातातले पूजेचे ताट खाली पडते. यावेळी दुर्गा अपशकून झाला असल्याचेही म्हणते. त्यामुळे मालिकेत आता नवीन काय वळण येणार? अक्षरा याला अपशकून मानेल की अपघात? हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.
दरम्यान, मालिकेत नुकतीच सरगम मॅडमची एंट्री झाल्यामुळे काही प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. काहींना कथानकातील हा ट्विस्ट आवडला नसून कमेंट्सद्वारे त्यांनी याविषयी आपले मत मांडले आहे. त्यामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात सरगम मॅडममुळे काही अडथळा येणार का? हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.