‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर आता त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे दिसत आहे. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत आहे.
राजाध्यक्ष कुटुंबातील अद्वैत, नेत्रा व इंद्राणी या तिघांव्यतिरिक्त रुपालीने घरातील सर्वांनाच तिच्या बाजून वश केल्यामुळे देवीआईच्या लेकी हतबल झाल्या आहेत. त्यामुळे आता काय करावे? हे त्यांना काळात नाहीये. अशातच मालिकेच्या कथानकाची उत्कंठा वाढवणारा प्रोमो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे आणि या प्रोमोद्वारे नेत्रा व इंद्राणी रुपालीचा बंदोबस्त करताना दिसत आहे. रुपाली समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून वश करते.
आणखी वाचा – पारूमुळे होणार अहिल्यादेवींचा गैरसमज, किर्लोस्कर बंगल्यापासून ठेवणार का तिला दूर?, मालिकेला मिळणार नवं वळण
रुपालीच्या या वश करण्याच्या युक्तीबद्दल आता नेत्रा व इंद्राणी यांना माहिती झाली असून या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा व इंद्राणी रुपालीच्या डोळ्यांत तिखट मसाला टाकताना दिसत आहेत. त्यानंतर त्या दोघी व अद्वैत रुपालीच्या गळ्यात साखळदंड अरकवून तिला एका कालकोठरीत डांबतानाचे पाहायला मिळत आहे. यावेळी नेत्रा व इंद्राणी रुपालीला “त्रिनयना देवीच्या भक्तांनी तुला आता अडकवलं आहे. त्यामुळे आता मरेपपर्यंत इथेच राहायचं.” असं म्हणताना दिसत आहेत.
त्यामुळे आता अखेर त्रिनयना देवीच्या लेकींना रुपालीच्या शक्तीविरुद्ध लढण्याचे तंत्र आता माहीत झाले असून रुपाली आता त्यांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे आता नेत्रा व इंद्राणी राजाध्यक्ष कुटुंबियांना कसं सोडवणार?, रुपालीच्या या ताब्यात जाण्यामुळे विरोचकाचा अंत होणार का? हे मालिकेत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.