‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘पारू’ या मालिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ‘पारू’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. सध्या ही मालिका तिच्या कथानकामुळे गाजत आहे. या मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेत सध्या पारूचा खडतर प्रवास आणि या प्रवासात आलेल्या संकटाना तोंड देत तिची लढाई पाहणं रंजक ठरत आहे. पारू या मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. (Mugdha Karnik At Mumbai)
तर मालिकेत आदित्य ही भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारत आहे. विशेषतः या मालिकेतील अहिल्यादेवी या पात्राने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. अहिल्यादेवी या पात्राचं मालिकेत महत्त्वाचं स्थान असलेलं पाहायला मिळत आहे. सर्वाधिक वजनदार अशी भूमिका या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलतील तो शेवटचा शब्द असतो. त्यांच्या शब्दाबाहेर कोणतीच गोष्ट होत नसल्याने अहिल्यादेवी यांची मुख्य अशी भूमिका मालिकेत दाखविण्यात आली आहे.

‘पारू’ या मालिकेत अहिल्यादेवी ही भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे. करारी नजर, कठोर स्वभाव, एकचाली देहबोली ही अहिल्यादेवी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मुग्धा कर्णिक हिने अहिल्यादेवी या पात्रातून प्रेक्षकांच्या मनात यशस्वी अशी छाप उमटवली आहे. मालिकेचं चित्रीकरण सध्या सातारा येथे सुरु आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी सातारा येथे राहत आहेत. चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत ही कलाकार मंडळी त्यांच्या घरी येत असतात.
अशातच मालिकेतील अहिल्यादेवी म्हणजेच अभिनेत्री मुग्धा कर्णिक ही देखील वेळात वेळ काढत मुंबईत आली आहे. मुग्धा ही मुंबईची आहे. मुंबईत येऊन ती मुंबईनगरीत फिरताना दिसत आहे. शिवाय मुंबईत येऊन आमरसवरही अभिनेत्रीने ताव मारला आहे. शिवाय उशिरापर्यंत अभिनेत्री बाईक वरुन फिरत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. जीवाची मुंबई असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.