सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंग रील शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा त्या त्यांचे पती अविनाश नारकर यांच्यासह डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. या वयात दोघांची एनर्जी तरुणाईला लाजवेल अशी आहे. या डान्स व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोलही केलं आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता त्या नेहमीच ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर देत असतात. (Aishwarya Narkar Answers To Trollers)
ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या सेटवरील धमाल, मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ त्या नेहमीच शेअर करत असतात. मालिकेतील कलाकारांबरोबर त्या नेहमीच हटके आणि ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवत असतात. अशातच ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक रील शेअर केलं आहे. या रीलवर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगला ऐश्वर्या यांनी उत्तरही दिलेलं पाहायला मिळतं.
ऐश्वर्या नारकर यांनी तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, एकता या कलाकारांसह एक फनी रील व्हिडीओ शूट केला आहे. सध्या इंटरनेटवर कार्टून स्वरूपात चेटकणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या डायलॉगवर आता ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता, अमृताने व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर व अमृता अभिनय करताना दिसत आहेत, तर एकता व तितीक्षा त्यांच्यासाठी डायलॉग बोलताना दिसत आहेत. अभिनेत्रींचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलदेखील केलं आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय?”,या ट्रोलिंगला उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “बोलण्यात ताकद वाया घालवू नका मजा करा. आयुष्य एकदाच मिळतं. ते पूर्ण जगा”. ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा दर्शिवला आहे. “मान्य आहे. प्रत्येक क्षण हसत जगा”, “ज्यांनी असले अॅनिमेटेड व्हिडीओ पाहिले नाहीत त्यांना तुम्ही काय करताय ते समजणार नाही. त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करा”, असं म्हणत त्यांना सपोर्ट केला आहे.