रविवार, मे 18, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पाकिस्तानातील मराठी मुलाने स्वतःच्या लग्नात ‘गुलाबी साडी’वर केला भन्नाट डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2024 | 12:44 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Gulabi Sadi Song Viral

Video : पाकिस्तानातील मराठी मुलाने स्वतःच्या लग्नात 'गुलाबी साडी'वर केला भन्नाट डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्...; व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच सध्या या ट्रेंडिंग गाण्यांच्या यादीत ‘गुलाबी साडी’ या गाण्याची क्रेज असलेली पाहायला मिळते. इन्स्टाग्राम रीलवर तर गुलाबी साडीने अक्षरशः हैदोस घातला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर संपूर्ण जगभरात या गाण्याने भुरळ घातली आहे. बॉलिवूडमध्येही या गाण्याने साऱ्यांची मन जिंकली. अगदी माधुरी दीक्षित, नेहा कक्करलाही या गाण्याने थिरकायला भाग पाडलं. तर आफ्रिकेच्या किली पॉललाही या गाण्याने ठेका धरायला लावला. (Gulabi Sadi Song Viral)

सध्या सर्वत्र आयपीएलची क्रेज सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या आयपीएलमध्येही गुलाबी साडी गाणं वाजलं आणि क्रिकेटप्रेमींनी या गाण्यावर ठेका धरला. अशातच आता या गाण्याच्या एका व्हिडीओने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून ‘गुलाबी साडी’ गाण्याची केवढी क्रेझ वाढली आहे याचा अंदाज येतो.

आणखी वाचा – “लग्न झालं तरी साडी नेसत नाही का?”, बायकोवरुन प्रश्न विचारताच भडकला चेतन वडनेरे, नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत म्हणाला, “माझ्या आईने…”

View this post on Instagram

A post shared by A M A R (@theamarparkash)

गुलाबी साडीवर होणारा हा व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचा दावा संबंधित नेटकऱ्याने केला आहे. अमर प्रकाश या पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या इन्टाग्राम अकाउंटवरुन ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “जेव्हा तुम्ही पाकिस्तानमधील मराठमोळ्या लग्नसमारंभात ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स करता…”, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओवर संजू राठोडनेही कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. “खूपच छान”, अशी कमेंट संजूने केली आहे.

आणखी वाचा – क्रांती रेडकरच्या मुलींनी वडिलांच्या पायावर डोकं ठेवत केला नमस्कार, मुलींच्या संस्कारांचं होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानमधील या व्हायरल व्हिडीओवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहे. तर या गाण्यामुळे संजू राठोड चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर वाजणाऱ्या या गाण्याची क्रेज पाहता सगळीकडून संजूच कौतुक केलं जात आहे. फेब्रुवारी महिन्यात हे गाणं प्रदर्शित केलं. या गाण्याला आता कोटींच्या घरात व्ह्यूज मिळाले असून हे गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेडिंग गाण्यांच्या यादीमध्ये आहे. याआधीही संजूच्या ‘नऊवारी साडी’ या गाण्याने साऱ्यांची मन जिंकली होती.

Tags: entertainmentgulabi sadiGulabi Sadi Song Viraltrending reel video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sonali Kulkarni Fitness
Lifestyle

५०शीमध्येही सोनाली कुलकर्णी इतक्या फिट कशा?, अभिनेत्रीने सांगितल्या खास टिप्स, तुमच्यासाठीही उपयोगी

मे 18, 2025 | 6:00 pm
Amruta Khanvilkar Husband On Parenting
Entertainment

अमृता खानविलकर आई होणार का?, नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला, “सुरुवातीला एक काळ होता की…”

मे 18, 2025 | 2:00 pm
Actress mugdha shah life
Entertainment

सासू-सासरे, नणंदांनी छळलं, नवऱ्याचा पाठिंबा नाही आणि…; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख

मे 18, 2025 | 9:29 am
Marathi Youth Clashesh With UP Cab Driver
Social

Video : युपी टॅक्सीचालकाला मराठी तरुणाने भररस्त्यात मारलं, तुम्हीच सांगा चुकी नक्की कोणाची?, उलट उत्तर अन्…

मे 17, 2025 | 7:00 pm
Next Post
Sharayu Sonavane Mehandi Ceremony

ना हातभर मेहंदी, ना अवाढव्य खर्च; लग्नाच्या वर्षभरानंतर 'पारू' फेम शरयू सोनावणेच्या मेहंदी सोहळ्याची रंगली चर्चा, साधेपणाचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.