बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमृता खानविलकर आई होणार का?, नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला, “सुरुवातीला एक काळ होता की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 18, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar Husband On Parenting

अमृता खानविलकर आई होणार का?, नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला, "सुरुवातीला एक काळ होता की…"

Amruta Khanvilkar Husband On Parenting : अनेक कलाकार मंडळी अशी आहेत जी लग्नानंतर काही वर्षातच मुलं जन्माला देण्याच ठरवतात आणि गुडन्यूज देतात. तर अशी काही कलाकार मंडळी आहेत जी बाळाला जन्म देण्याचा उशिरा विचार करतात. अनेकदा चाहतेमंडळीही या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच जाणून घेण्यास उत्सुक असतात. अशातच सध्या अमृता खानविलकरच्या पतीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेलं भाष्य साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यावेळी अमृता खानविलकरचा नवरा हिमांशू मल्होत्राने पालकत्वाबाबत भाष्य केलं. पालक बनण्याचा त्यांचा विचार आहे की नाही याबाबत हिमांशूने मत मांडलं आहे. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा त्याने केलेल्या विधानाकडे लागून राहिल्या आहेत.

हिमांशूने नुकतीच ‘फिल्मी बिट’ला मुलाखत दिली. यावेळी हिमांशूने अनेक विषयावर गप्पा मारल्या. त्याला वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी “‘बाबा होण्याचे काही प्लॅनिंग केले आहेस का?’, असा प्रश्न हिमांशूला विचारण्यात आला. यावर उत्तर देत हिमांशू म्हणतो, “नाही, अजून तरी नाही. याबाबत अजूनतरी काही विचार केलेला नाही”. त्यांनतर मुलाखतदार ‘पालक होण्याच्या निर्णयाबाबत तुझ्यात आणि अमृतामध्ये काही बोलणं झालं आहे का?’, असं विचारतो. यावर हिमांशू म्हणतो, “नाही. आता अशी चर्चा आमच्यात नाही होत. सुरुवातीला एक काळ असा होता जेव्हा आम्ही याबाबत बोलायचो. पण आता तरी आम्ही या निर्णयापर्यंत येऊन नाही पोहोचलो आहोत. जेव्हा नियती ठरवेल तेव्हाच हे शक्य होईल”.

आणखी वाचा – “गुटखा विक्री, पुड्या विकणारे शांत का?”, सुप्रसिद्ध गायकाचा बॉलिवूड कलाकारांकडे इशारा, म्हणाला, “पाकिस्तानचा नाश…”

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

पुढे हिमांशु म्हणाला, “पाच-सहा वर्षांपूर्वी एक स्टार नेटवर्कसाठी एक शो केला होता. तिथे एक लहानशी मुलगी मला भेटली. वैष्णवी असे तिचे नाव आहे. आठ-नऊ वर्षांची असेल. मी तिला माझी मुलगी मानतो. माझ्या मुलाप्रमाणेच तिची काळजी घेतो. सध्या ती शूटिंगसाठी चंदिगढला जाणार आहे”. एकूणच अमृता व हिमांशू यांचा सध्या तरी आई-बाबा होण्याचे काहीच प्लॅनिंग नसल्याचे समोर आले. अमृता आणि हिमांशू एकत्र राहत नसल्याच्याही अनेक चर्चा वेळोवेळी होताना दिसतात. मात्र करिअरच्या दृष्टिकोनातून ते वेगळे राहत आहेत असं म्हणत त्यांनी ही बाजू सांभाळली आहे.

आणखी वाचा – “लगेच चिडली आणि…”, अमृता खानविलकरने नवऱ्याला केलेलं अनफॉलो, हिमांशू अखेर म्हणाला, “रागारागात तिने मला…”

अमृता खानविलकरने २०१५ मध्ये हिमांशू मल्होत्रा बरोबर लग्न केले होते. विशेष म्हणजे दोघेजण लग्नापूर्वी साधारण दहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. २००४ मध्ये ती दोघं एकमेकांना पहिल्यांदाच भेटले होते. हळूहळू मैत्री झाली आणि मग ते एकमेकांवर प्रेम करु लागले. अमृता महाराष्ट्रीयन तर हिमांशू पंजाबी आहे. अमृता मुंबईची लेक तर हिमांशू दिल्लीचा मुलगा आहे.

Tags: amruta khanvilkar and himanshu malhiotracelebrity couplemarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Sonali Kulkarni Fitness

५०शीमध्येही सोनाली कुलकर्णी इतक्या फिट कशा?, अभिनेत्रीने सांगितल्या खास टिप्स, तुमच्यासाठीही उपयोगी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.