बुधवार, जून 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : युपी टॅक्सीचालकाला मराठी तरुणाने भररस्त्यात मारलं, तुम्हीच सांगा चुकी नक्की कोणाची?, उलट उत्तर अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 17, 2025 | 7:00 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Youth Clashesh With UP Cab Driver

Video : युपी टॅक्सीचालकाला मराठी तरुणाने भररस्त्यात मारलं, तुम्हीच सांगा चुकी नक्की कोणाची?, उलट उत्तर अन्...

Marathi Youth Clashesh With UP Cab Driver : महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा बोलणे सक्तीची आहे यावरुन बरेच वाद होताना पाहायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या संभाषणातील मराठी सक्तीची हा मुद्दा अनेकांनी उचलून धरलेला दिसत आहे. मुंबईतील अनेक भागांत मराठी विरुद्ध हिंदी भाषा यावरुन आजवर अनेक खटके उडाले आहेत. आणि याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर हा वाद आता चिघळत जात हिसंक वळण घेतानाही पाहायला मिळत आहे. भाषेच्या मुद्द्यावरुन मारामारी झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात मराठी भाषा बोलण्यावरुन एका कॅब चालकांमध्ये आणि मराठी माणसांत जोरदार वाद झाला. सध्या हा वाद तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये, एका तरुणाने ऑनलाइन कॅब बुक केली असल्याचं दिसत आहे.

कॅब चालकाने त्याची राईड रिक्वेस्ट स्वीकारली. मात्र चालक कॅब घेऊन पाच मिनिटं उशिरा पोहोचला. आणि यानंतर तर चालकाने हद्द पार केली. उशिरा पोहोचल्यानंतर त्याने मला जायचं नाही असं सांगण्यास सुरुवात केली. तर व्हिडीओमध्ये असं कळलं की, मराठी तरुणाच्या म्हणण्यानुसार, चालक त्याच्या डोळ्यांसमोरच कॅबमध्ये बसून होता, पाच मिनिटे उशिरा येऊन शेवटी त्याने राईडच रद्द केली. यावर चिडून मराठी तरुणाने त्याला जाब विचारला. जर तुला जायचं नव्हतं मग राईड रिक्वेस्ट का स्वीकारलीस? त्यावर कॅब चालकाने उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली, त्यामुळे तरुण संतापला आणि वादाला सुरुवात झाली.

आणखी वाचा – Video : लेकाचं यश पाहताना रोहित शर्माच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत पाणी, बायकोही रडली अन्…; क्रिकेटरच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक

Kalesh b/w a Cab driver and Passenger (UP based Ola driver beaten for coming late 5 minutes and cancelling ride despite speaking Marathi) pic.twitter.com/1N8Ee8ENIQ

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 15, 2025

या वादाला काही वेळातच मराठी विरुद्ध हिंदी असे वळण मिळाले. कारण चालक हा उत्तर भारतीय होता आणि तो सुरुवातीला हिंदी भाषेत उत्तर देत होता. व्हिडीओ शूट करत तो तरुण कॅब चालकाला खडसावतानाही दिसला. कॅब चालक ही त्या तरुणाला “तुम्हाला जे करायचं ते करा, मला काहीच फरक नाही”, असा उर्मट भाषेत उत्तर देताना दिसला. यावर त्या तरुणाने कॅब चालकाला धमकावले. “तुझी आरटीओमध्ये तक्रार करु का?”, असं विचारलं. यावर त्या चालकाने उत्तर देत, “जा कर तक्रार”, असं म्हटलं.

आणखी वाचा – “गुटखा विक्री, पुड्या विकणारे शांत का?”, सुप्रसिद्ध गायकाचा बॉलिवूड कलाकारांकडे इशारा, म्हणाला, “पाकिस्तानचा नाश…”

उलट उत्तर मिळताच आणि कसलीच भीती नाही हे समजताच हा वाद पेटला. त्या मराठी तरुणाने आणि त्याच्याबरोबर असलेल्या लोकांनी कॅब चालकाला बाहेर काढत मारण्यास सुरुवात केली. शेवटी घाबरुन तो कॅब चालक गाडी तिथेच सोडून पळून जाताना दिसला. हा व्हिडीओ gharkekalesh या अकाउंटवरुन सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी कमेंट करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. मराठी भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सुरु असल्याचंही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Tags: marathi languagemarathi vs hindi fightMNS Leader
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

mangesh desai the maharashtra files
Entertainment

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, १२ जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात

जून 9, 2026 | 10:59 am
Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Next Post
Actress mugdha shah life

सासू-सासरे, नणंदांनी छळलं, नवऱ्याचा पाठिंबा नाही आणि...; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.