गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्न झालं तरी साडी नेसत नाही का?”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला बायकोवरुन प्रश्न विचारताच भडकला, म्हणाला, “माझ्या आईने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Chetan Vadnere Answers to Fan

"लग्न झालं तरी साडी नेसत नाही का?", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला बायकोवरुन प्रश्न विचारताच भडकला, म्हणाला, "माझ्या आईने…"

मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असताना काही दिवसांपूर्वीच एक मराठमोळी कलाकार जोडी लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम चेतन वडनेरे अभिनेत्री ऋजुता धारपसह विवाह बंधनात अडकला. २२ एप्रिल रोजी ऋजुता व चेतन यांचा शाही विवाहसोहळा नाशिक येथे संपन्न झाला असल्यास समोर आलं. दोघांच्या लग्नाची विशेष चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. यापूर्वी लग्नाची कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी थेट लग्नसोहळा उरकला. सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांनी शेअर केली. (Chetan Vadnere Answers to Fan)

ऋजुता व चेतन हे त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावरही ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच चेतनने नुकताच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तर चेतनने दिली. दरम्यान अभिनेत्याला त्यांच्या लग्नाबाबत अनेक प्रश्न विचारले गेले. यावेळी विचारल्या गेलेल्या नेटकऱ्याच्या एका खटकणाऱ्या प्रश्नाला उत्तर देत त्याने चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्याने प्रश्न विचारत म्हटलं की, “ऋजुता लग्न झालं तरी साडी वगैरे नेसत नाही का? किती छान मुली सारखं वागणूक देत आहेत तुमचे मम्मी पप्पा”. यावर चेतनने चांगल्याच शब्दात सडेतोड उत्तर देत त्या चाहत्याला म्हटलं, “धन्यवाद. पण लग्नाचा आणि साडीचा खरंतर संबंध नाही आहे. माझ्या नऊवारी नेसणाऱ्या आजीने माझ्या सहावारी नेसणाऱ्या आईला समजून घेतलं. तसंच माझ्या सहावारी नेसणाऱ्या आईने पंजाबी ड्रेस, जीन्स-टॉप घालणाऱ्या माझ्या बायकोला समजून घेतलं आहे. कोणते कपडे वापरायचे ही ज्याची त्याची आवड असते, लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर…कपडे घालणं हे केवळ फॅशनचा भाग आहे”, असं म्हणत त्याने नेटकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

आणखी वाचा – पारूने हरिशबरोबर लग्नाला दिला नकार, अहिल्यादेवींचा शब्द मोडणार का?, तर दिशाने भरले दामिनीचे कान

‘झी युवा’ वाहिनीवर ‘फुलपाखरू’ या मालिकेत चेतन व ऋजुता एकत्र दिसले. या मालिकेत दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. आणि कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघेही मूळचे नाशिकचे असल्याने त्यांनी नाशिक येथे लग्न केले.

Tags: chetan vadnere and rujuta dharapChetan Vadnere Answers to Fanentertainmentmarathi actormarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Kranti Redkar Daugher with father

क्रांती रेडकरच्या मुलींनी वडिलांच्या पायावर डोकं ठेवत केला नमस्कार, मुलींच्या संस्कारांचं होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.