अभिनेत्री क्रांती रेडकरने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाशिवाय क्रांती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सध्या क्रांतीने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. मात्र ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. क्रांतीबरोबरच तिच्या दोन लेकी या चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. क्रांतीला जितकी लोकप्रियता मिळाली आहे त्याहून अधिक लोकप्रिय तिच्या लेकी आहेत. सोशल मीडियावरुन क्रांती नेहमीच तिच्या लेकींचे अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. (Kranti Redkar Daugher with father)
क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत. झिया व झिदा अशी त्यांच्या मुलींची नाव आहेत. लाडाने ती तिच्या लेकींना छबिल व गोदो अशी हाक देते. अशातच क्रांतीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये बाप-लेकीचं अनोखं नातं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या दोन्ही मुलींचे संस्कार व वडिलांवर असलेलं प्रेम पाहायला मिळत आहे. क्रांतीने हा वडील-मुलींचा सुंदर क्षण तिच्या कॅमेऱ्यात कैद करुन हा व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या दोन्ही लेकी तिच्या बाबांसह वेळ घालवताना दिसत आहेत. गोदो व छबिलने त्यांच्या वडिलांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत. तसेच दोघीही वडिलांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहेत. तसेच समीर वानखेडे दोन्ही मुलींना घेऊन गार्डनमध्ये खेळायलाही घेऊन गेलेले दिसत आहेत. ते त्यांच्या मुलींसह क्वालिटी टाइम शेअर करताना दिसत आहेत. यावेळी क्रांतीच्या दोन्ही मुलीची झलकही पाहायला मिळाली.
क्रांतीने आजवर तिच्या दोन्ही मुलींचा चेहरा सोशल मीडियावरुन दाखवलेला नाही. त्यामुळे साऱ्यांना क्रांतीच्या लेकींना पाहायची इच्छा आहे. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या लेकीची झलक पाहायला मिळाली. क्युट अशा तिच्या लेकी व्हिडीओमध्ये पाहायला मिळाल्या. आजवर क्रांती तिच्या लेकींचे पाठमोरे फोटो शेअर करताना दिसली आहे.