मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीपासून तो अधिक चर्चेत आला आहे. प्रथमेश हा त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. प्रथमेशच्या शाही विवाहसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्न केले. २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात दोघांनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. (Prathamesh Parab Wife Surprise)
प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर ही प्रथमेश व क्षितिजा बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. लग्नानंतर ही जोडी बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळते. बरेचदा ते एकत्र फिरतानाही दिसतात. अशातच क्षितिजाने खास तिच्या नवऱ्याच कौतुक करत त्याला एक सरप्राइज देतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
क्षितिजाने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “त्याने मला ९.२५ला मॅसेज करुन फायनलमध्ये पोहोचलो असल्याचं सांगितलं. मला खात्री होती की तो फायनल जिंकणार. त्यानंतर मी एक छोटंसं गिफ्ट द्यायचं ठरवलं. हे बॉटल आर्ट आहे”, असं म्हणत तिने बॉटल आर्ट केलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. या बॉटल आर्ट वर तिने क्रिकेटसंदर्भातील काही गोष्टींचे चित्रदेखील काढले होते. हे खास सरप्राइज देत क्षितिजाने प्रथमेशचा आनंद द्विगुणित केला.

“जेव्हा बायको आपल्याला सरप्राइज देते ते पण रात्री ३ वाजता”, असं कॅप्शन देत प्रथमेशने बायकोने दिलेल्या गिफ्टचा फोटो पोस्ट केला आहे. दोघेही कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून एकमेकांना वेळ देताना दिसतात.