शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बरीच मुलं वारसा घेतात पण…”, अभिनय बेर्डेबद्दल प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शकाची खास पोस्ट, म्हणाला, “अतिशय गुणी, मेहनती…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 6, 2024 | 5:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi writer, director and lyricist Kshitij Patwardhan shared post praising Abhinay Berde

“बरीच मुलं वारसा घेतात पण...”, अभिनय बेर्डेबद्दल प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शकाची खास पोस्ट, म्हणाला, “अतिशय गुणी, मेहनती…”

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आजही मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त मराठी नाही तर हिंदी सिनेसृष्टीलाही आपल्या अभिनयाने वेड लावले. लक्ष्मीकांत यांनी चंदेरी दुनियेसह रंगभूमीचे मंचदेखील गाजवले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा लेक अभिनय बेर्डेदेखील मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवत आहे. अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते?’ हा चित्रपट बराच गाजला.

‘ती सध्या काय करते?’नंतर ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४’ या चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. चित्रपटांतून मनोरंजन केल्यानंतर अभिनय आता रंगभूमीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. नुकतेच अभिनयचे ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक व गीतकार क्षितिज पटवर्धनने अभिनयसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. क्षितीजने सोशल मीडियावर अभिनयचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्यामागे भिंतीवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही फोटो पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kshitij Patwardhan (@kshitijpatwardhan)

आणखी वाचा – “आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन अन्…”, आदेश बांदेकरच्या लेकाने सांगितलं कसं करणार लग्न?, म्हणाला, “कोर्टात जाऊन…”

क्षितीजने लक्ष्मीकांत यांच्याबरोबरचा अभिनयचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अभिनयचे कौतुक करत त्याने असं म्हटलं आहे की, “मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला आणि पुढे अभिनय उभा आहे. फोटो काढताना असं वाटलं की, बरीच मुलं वारसा घेतात, पण याने (अभिनयने) वसा घेतला आहे. तू जिथे कुठे जाशील तिथे त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल! अतिशय गुणी, मेहनती, समजूतदार आणि उत्स्फूर्त अभिनेता. ‘आज्जीबाई जोरात’ पाहून प्रेक्षक आपल्याच मुलाचं कौतुक करावं तसं अभिनयचं कौतुक करतात. ही त्याची कमाई आणि त्याच्या आई-वडिलांची पुण्याई आहे.”

आणखी वाचा – “तब्येत जपा, खंडोबा आपणास…”, शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं भाष्य, म्हणाला, “तुमची मेहनत घेण्याची क्षमता…”

तर क्षितीजच्या या पोस्टवर अभिनयनेही उत्तर देत असं म्हटलं आहे की, “सर माझ्याकडे शब्द नाहीयेत, पण तुम्ही दिलेल्या संधी बद्दल तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, आपल्या नाटकाने मला एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून खूप गोष्टी दिल्यात. माझ्यावर हा विश्वास दाखवण्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार आणि खूप जास्त प्रेम.”

Tags: abhinay berdekshitij patwardhanmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amit Bhanushali Funny Video

ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीची रील पाहून चाहत्यांनी करुन दिली बायकोची आठवण, म्हणाले, "वहिनी झाडू घेऊन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.