मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर हे दोघेही सतत चर्चेत असतात. अविनाश व ऐश्वर्या दोघेही सोशल मिडियावरही अधिक सक्रिय असतात. ते नेहमी व्यायाम करताना, फिरताना, मजा-मस्ती करतानाचे सर्व फोटो व व्हिडीओ त्यांच्याअ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच दोघांनीही एक भन्नाट डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली असून अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. (aishwarya narakar on comments)
मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार अभिनयाबरोबरच आपला आवडता छंद जोपासताना दिसतात. त्यातील कलाकार म्हणजे ऐश्वर्या व अविनाश नारकर जोडी. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. आता दोघेही वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताना दिसतात. पण मालिकांच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून दोघेही रील्सदेखील बनवतात. अशातच त्यांनी नुकतेच एका गाण्यावर डान्स करतानाचे रील चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
आणखी वाचा – सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या, नेमकं घडलं तरी काय?

अविशान व ऐश्वर्या हे एका गाण्यावर दिलखुलासपणे डान्स करताना दिसत आहेत. अशातच एका नेटकऱ्याने अविनाश यांच्याबद्दल एक प्रतिक्रिया दिली. त्याने आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे की, “हे इतके घाणेरडे का दिसत आहेत?”, या प्रतिक्रियेला ऐश्वर्यायांनी लगेच उत्तर देत म्हंटले आहे की, “चांगलं व वाईट हे बघणाऱ्यांच्या नजरेत असतं. हे खरं नसतं. त्यामुळे तुम्ही यामध्ये पडू नका. आयुष्य एंजॉय करा. ते महत्त्वाचं आहे. खुश रहा. अनेकदा आपण जे देतो तेच आपल्याला युनिव्हर्स परत देखील देतो”.
त्यावर पुन्हा नेटकऱ्याने लिहिले की, “आयुष्य एंजॉय करायला हवं हे नक्की. पण काही वेळा रील्समधून विचित्र वाईब बघायला मिळतात. तुमचा कलाकार म्हणून मी खूप आदर करते”. त्यावर ऐश्वर्या यांनी पुन्हा उत्तर दिले की, “यावर साधा उपाय म्हणजे अनफॉलो करणे”.
दरम्यान अनेकदा शांत राहणाऱ्या ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देऊन बोलती बंद केल्याचे दिसून आले आहे. ऐश्वर्या यांच्या कामबद्दल बोलायचे झाले तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत.