टेलिव्हिजन अभिनेत्री आरती सिंह सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आरती दीपक चौहानबरोबर लग्नबंधनात अडकली. जुहू येथे धूमधडाक्यात तिचा विवाहसोहळा पार पडला. तिच्या लग्नासाठी मनोरंजन क्षेत्रातील सर्व कलाकारमंडळी उपस्थित होते. मामा गोविंदादेखील आरतीच्या लग्नात सहभागी झाला होता. त्यामुळे गेलया अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या भांडणालाही पूर्णविराम लागल्याचे दिसून आले. लग्नामध्ये तिने घातलेल्या लाल रंगाच्या लेहंग्यानेदेखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आरती तिच्या लग्नात खूप खुश दिसत होती. पण तिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया तिच्या आयुष्याबद्दल. (arti singh on depression)
आरतीने वयाच्या 39 व्या वर्षी दीपकबरोबर लग्नबंधनात अडकली. पण त्याआधी तिचे बालपण अतिशय दु:खात गेले आहे. अगदी लहान वयातच तिने आई-वडिलांना गमावले आहे. वयाच्या 13 व्या वर्षी तिच्याबरोबर असा प्रसंग घडला ज्यामुळे तिला नैराश्य आले होते. पण त्यामधून तिने स्वतःला सावरत मनोरंजन क्षेत्रामध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्त्व निर्माण केले. ‘बिग बॉस’मध्ये देखील ती सहभागी झाली होती. पण याआधी तिला खूप संकटांचा सामना करावा लागला होता.
आरती जेव्हा 20 दिवसांची होती तेव्हा तीच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे तिला तीच्या आईचे प्रेम कधीही मिळाले नाही. याबाबत तिने ‘बिग बॉस’मध्ये याबद्दल व्यक्त झाली होती. आरतीच्या वडिलांनी आईच्या निधनानंतर कसा सांभाळ केला याबद्दल सांगितले होते. तिने सांगितले की, “मुलांचा सांभाळ करण्यामध्ये कोणत्याही समस्या येऊ नये यासाठी वडिलांनी मला व माझ्या भावाला एका मित्राला दत्तक दिले होते. त्यानंतर आरती भाऊ व वडिलांपासून दूर गेली. पण जेव्हा पाच वर्षाची झाली तेव्हा वडिलांचेदेखील निधन झाले”.
त्यानंतर 13 वर्षाची असतानादेखील आरतीबरोबर वाईट प्रसंग घडल्याचेही सांगितले. त्यामुळे नैराश्य आले व तिला पॅनिक अटॅकदेखील येत होते. याबद्दल तीने सांगितले की, “13 वर्षाची असताना घरी असलेल्या नोकराने लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यापासून संरक्षण करण्यासाठी छतावरुन उडी मारली होती. या प्रसंगामुळे मनावर खूप वाईट परिणाम झाला आणि खूप वर्ष नैराश्याचाही सामना करावा लागला होता”. ‘बिग बॉस’मध्ये देखील पॅनिक अटॅक आला होता.
तसेच याबरोबर दोन वेळा ब्रेकअपचे दु:खही तीच्या वाट्याला आले होते. ती अभिनेता आयाज खानबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तीन वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यानंतर दोघेही वेगळे झाले. पण सध्या ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे.