मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राजकारणावर कविता केल्यानंतर राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेला घरी बोलावलं अन्…; म्हणाला, “भीतीपोटी अडीच तास शिवाजी पार्कात फिरलो आणि… “

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 29, 2024 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Raj Thackeray Appreciate Sankarshan karhade

राजकारणावर कविता केल्यानंतर राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेला घरी बोलावलं अन्…; म्हणाला, "भीतीपोटी अडीच तास शिवाजी पार्कात फिरलो आणि… "

महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित एका अभिनेत्याच्या कवितेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय वातावरणावर आधारित संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत एक सुंदर अशी कविता सादर केली आहे. या कवितेचं आणि संकर्षणचं सर्वच स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, विनोद तावडे, आशिष शेलार या दिग्गज राजकीय मंडळींनी फोन करुन संकर्षणच्या कवितेचं कौतुक केलं. (Raj Thackeray Appreciate Sankarshan karhade)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर अभिनेत्याला थेट शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण दिलं. हा सगळा अनुभव संकर्षणने ‘एबीपी माझा’शी संवाद साधत शेअर केला. राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट देत तिथे घडलेल्या भेटीचा किस्सा त्याने शेअर केला आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या घरी संकर्षणचं कौतुक कसं झालं, आणि तिथवर पोहोचेपर्यंत संकर्षणच्या मनात सुरु असलेल्या धाकधूकबद्दलही तो स्पष्टपणे बोलला.

आणखी वाचा – विरोचकाने शरीराचा ताबा घेतल्यानंतर केतकी व फाल्गुनी एकमेकींचाच जीव घेणार, नेत्राला देवीआईचा संकेत अजूनही नाही, बळी जाणार का?

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

यावेळी राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यानचा किस्सा सांगत संकर्षण म्हणाला, “मला राज साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला आज सकाळी ११ वाजता भेटायला बोलावलं. त्या दिवशी सकाळी ७ वाजता मी मीरा रोडहून माझ्या घरातून बाहेर पडलो. ते भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणतील या विचारात मी होतो. वेळेच्या आधी अडीच तास शिवाजी पार्कात फिरत होतो. का तर मला फार धाकधूक होती. मी त्यांच्या घरात पोहचल्यावर घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला की मी त्यांच्या घरात येऊन बसलो आहे. तेव्हापासून माझे बाबा सारखे बीपी चेक करत होते. आणि मी हे जाऊन राज साहेबांना सांगितलं. त्यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी मला मिश्किलपणे म्हटलं की, “घरच्यांना सांगा सुखरुप बाहेर पडलो आहे”.

आणखी वाचा – “मला कानाखाली मारली, चावली अन्…”, पहिल्या बायकोकडून मिळालेल्या वागणूकीवर आमिर खानचा खुलासा, म्हणाला, “खूप वेदना…”

यापुढे संकर्षणने असेही म्हटलं की, “राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ताईदेखील होत्या. मी त्यांच्याशी बोलताना एकदाही त्यांनी मला तू असं का लिहिलं, तसं का लिहिलं काहीही विचारलं नाही. त्यांनी माझ्याशी नेहमीसारख्या गप्पा मारल्या. कुठे राहत आहेस?, तुझं कसं चाललंय?, नाटक काय म्हणत?, घरी कोण कोण असतं?, सिनेमा, राजकारण, भारत, महाराष्ट्र अशा सगळ्या प्रकारची चर्चा त्यांनी अगदी आनंदाने केली”.

Tags: marathi actorpolitical poeraj thackerayRaj Thackeray Appreciate Sankarshan karhadesankarshan karhade poem
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Next Post
Tula shikvin changlach dhada Promo

अधिपतीने गाणं शिकण्याची अक्षराची इच्छा, भूवनेश्वरी मात्र संपूर्ण डाव मोडणार, सासू-सूनांमध्ये पुन्हा नवा वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.