शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझा नवरा गेला मेहंदी कसली काढतेस?”, यशच्या लग्नात अरुंधतीला नको नको ते बोलली संजना, मेहंदी कार्यक्रमात अपमान

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 24, 2024 | 1:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte serial new update Sanjana insults Arundhati at Yash's Mehndi ceremony

"तुझा नवरा गेला मेहंदी कसली काढतेस?", यशच्या लग्नात अरुंधतीला नको नको ते बोलली संजना, मेहंदी कार्यक्रमात अपमान

‘आई कुठे काय करते?’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणाने ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मध्यंतरी मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांचा हिरमोड केला होता. मात्र आता पुन्हा एकदा मालिकेच्या नव्या प्रवासाने प्रेक्षकवर्गावर छाप पाडली आहे. मालिकेत सध्या अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हेतर आशुतोषच्या मृत्यूनंतर सुलेखा ताईंनी अरुंधतीला बाहेरचा रास्ता दाखवला. यावेळी कांचन आजी मात्र अरुंधतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.  

अशातच आता मालिकेत यश व आरोहीच्या लग्नापर्यंत मालिकेचे कथानक आले आहे. मालिकेत एकीकडे त्यांच्या लग्नाची धामधुम सुरु असतानाच अरुंधती आपल्या लेकाच्या लग्नात हिरीरीने सहभाग घेत आहे. मात्र हीच गिष्ट संजनाला खटकत आहेत आणि यामुळे ती अरुंधतीला टोचून बोलण्याचे एकही संधी सोडत नाही आहे. अशातच मालिकेत नुकताच एक नवीन प्रोमो आला आहे. ज्यात रुपापली अरुंधतीचा अपमान करताना पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

यामध्ये यशचा मेहंदी सोहळ्यानिमित्त अरुंधती रुपालीच्या हातावर मेहंदी काढत असते. यावेळी रुपाली अरुंधतीला असं म्हणते की, “अरुंधती तू माझ्या मेहंदीकडे लक्ष दे. हातावर अनिरुद्धचं नाव छान मोठ्या अक्षरात लिही. तो माझा नवरा आहे. त्यामुळे चार-चौघांत माझ्या हातावरील त्याची नाव उठून दिसायला हवे आहे.”

आणखी वाचा – “त्यांचा राग आमच्यावर पण…”, भाचीचं लग्न पण गोविंदाची आरती सिंहच्या हळदीला अनुपस्थिती, कश्मीरा शाह म्हणाली, “ते माझे सासरे…”

यापुढे रुपाली मुद्दाम अरुंधतीला दुखावण्यासाठी असं म्हणते की, “आता तुला बिचारीला मेहंदी काढणे कुठे शक्य आहे. नवरा गेला आहे की नाही तुझा? हातावर मेहंदी जरी काढलीस तरी लोक तुला नाव ठेवतील. नवऱ्याचे नाव कुठे लिहिणार आहेस तू?”

आणखी वाचा – विरोचकाने रुपालीला दिली वेगळीच शक्ती, नेत्राला देवी आईचा नवा संकेत, घरात भांडणं होणार

दरम्यान, ‘आई कुठे काय करते?च्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर काहणणी अरुंधतीची बाजू घेत संजनाविरुद्ध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मात्र संजनाची बाजू घेतली आहे.        

Tags: aai kuthe kay kartemarathi entertainment newsmarathi serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

"तिचा चुडा भरण्याचा अधिकार तुला नाही", अरुंधतीने नवरा गमावल्यानंतर संजनाने हिणवणं कितपत योग्य?, लग्नामध्ये कौटुंबिक वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.