बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची व कॉमेडीयन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहची लगीनघाई सुरु झाली आहे. आरती तिचा प्रियकर दीपक ठाकूरबरोबर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या २५ एप्रिलला आरतीचा शुभविवाह संपन्न होणार असून तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अशातच नुकताच तिच्या हळदी समारंभातील खास क्षणांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी आरतीची बॅचलर पार्टी आयोजित करण्यात आली होती. यानंतर काल अगदी थाटामाटात आरतीचा हळदी समारंभ पार पडला,
आरतीच्या या लग्न सोहळ्यात तिच्या कुटुंबियांव्यतिरिक्त तिचे अनेक मित्रमंडळीदेखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आतापर्यंत तिचे मामा म्हणजेच अभिनेता गोविंदा या आरतीच्या कोणत्याही विधींमध्ये सहभागी झालेला दिसला नाही. तसेच गोविंदाच्या कुटुंबातील कोणीही आरतीच्या लग्न सोहळ्यातील विधींना हजेरी लावलेली नाही. अशातच आता आरतीची वहिनी म्हणजेच कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाहने तिच्या गोविंदाच्या येण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपीच्या वृत्तानुसार ‘एचटी सिटी’शी बोलताना कश्मीरा असं म्हणाली की, ते (गोविंदा) आमच्यावर रागावले असतील, पण आरतीवर नाही. हे कृष्णाचे लग्न नाही. ते आमच्यावर रागावले आहेत, ते आमच्या लग्नाला आले नसते तर आम्ही समजू शकलो असतो. पण हे आरतीचे लग्न आहे आणि आरतीच्या लग्नाला तिच्या मामाने यावे अशी तिची इच्छा आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी आरतीच्या लग्नाला यावे आणि आमचा राग आरतीवर काढू नये”.
आणखी वाचा – विरोचकाने रुपालीला दिली वेगळीच शक्ती, नेत्राला देवी आईचा नवा संकेत, घरात भांडणं होणार
याशिवाय कश्मीराने गोविंदाला सासरे म्हणून संबोधले आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “आमच्या कुटुंबासाठी हा एक मोठा सोहळा आहे आणि यानिमित्ताने त्यांचे स्वागत मनापासून करायचे आहे. मी त्यांची सून आहे. मला माझ्या सासऱ्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. कुटुंबात अशा गोष्टी घडतात, पण आपलं एकमेकांवरील प्रेम कमी होतं असं नाही”.
आणखी वाचा – ‘मेष’ ते ‘मीन’पैकी कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आज आर्थिक यश?, कसा असणार तुमचा आजचा दिवस?
त्यामुळे आता गोविंदा पूर्वीचे वादविवाद, भांडणं विसरून आपल्या भाचीच्या लग्नाला जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, आरती सिंहचा विवाह २५ एप्रिल रोजी मुंबईतील इस्कॉन मंदिरात होणार आहे. आरती सिंह मुंबईतील बिझनेसमन दीपक चौहानसह लग्न करत आहे. या जोडप्याने साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.