रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सहा वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर कुशा कपिला कॉमेडियनला करत आहे डेट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 19, 2024 | 5:22 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
kusha kapila love rumors

सहा वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर कुशा कपिला कॉमेडियनला करत आहे डेट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

सध्या स्टँडअप कॉमेडीमुळे अनेक चेहरे खूप प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यातील काही कलाकारांनी बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली. त्यातील एक आघाडीची कलाकार म्हणजे कुशा कपिला. कुशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ६ वर्ष संसार केल्यानंतर पती जोरावर अहलुवालियाबरोबर घटस्फोट घेतला. याबद्दल तिने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. (kusha kapila love rumors)

तिचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूरबरोबर जोडले गेले होते. त्यानंतर लगेचच कुशाने याबद्दल खुलासा करत असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा तिच्या डेटिंगबद्दलची अनेक वृत्त ऐकायला मिळत आहेत. ती आता प्रसिद्ध कोमेडियन व अभिनेता अनुभव सिंह बस्सीला डेट करत आहे. दोघांबद्दलची एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने दोघांच्या नात्याच्या चर्चाना उधाण आले आहे.

आणखी वाचा – “जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा…”, ईडीच्या कारवाईनंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची पोस्ट, म्हणाला, “ही प्रगती आहे आणि…”

View this post on Instagram

A post shared by Kusha Kapila (@kushakapila)

मिळालेल्या माहितीनुसार कुशा व अनुभव हे दोघंही गोव्यामध्ये एकत्र फिरायला गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. हे पाहून दोघांचेही चाहते खूप हैराण झाले होते. पण अद्याप कुशा व अनुभव यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.

आणखी वाचा – नीना गुप्ता होणार आजी, वयाच्या ३४ व्या वर्षी लेक मसाबा गरोदर, अभिनेत्री म्हणाली, “मुलांचे मूल…”

अनुभवच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने त्याच्या करियरची सुरुवात एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून केली होती. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ हीट झाले होते. त्याच्या सगळ्या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्युज मिळाले आहेत.  त्याचे कॉमेडीचे अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याचीही संधी मिळाली. तो अभिनेता रणबीर कपूरबरोबर ‘तु झुटी मै मक्कार’ या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून आला होता.

तसेच कुशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने भूमी पेडणेकरबरोबर ‘ थॅंक यू फॉर कमिंग’ व शिल्पा शेट्टीबरोबर ‘सुखी’ या चित्रपटात दिसली होती.

Tags: anubhav singh bassikusha kapilaromantic affair
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aathvi A series Success Party to be celebrated in Satara tomorrow see the details

‘आठवी-अ’ वेबसीरिजला भरघोस प्रतिसाद, उद्या साताऱ्यात होणार खास सेलिब्रेशन, प्रेक्षकांना कलाकारांना भेटण्याची सुवर्ण संधी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.