रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रस्त्यावर मारामारी केली, रागाच्या भरामध्ये सैफ अली खान व भांडणारा व्यक्ती एकमेकांना चावले अन्…; रुग्णालयही गाठावं लागलं कारण…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 13, 2024 | 4:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saif Ali Khan bit a person on road Kamal Sadana revealed that see the details

रस्त्यावर मारामारी केली, रागाच्या भरामध्ये सैफ अली खान व भांडणारा व्यक्ती एकमेकांना चावले अन्...; रुग्णालयही गाठावं लागलं कारण...

बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सैफ अली खान. ‘दिल लगी’ व ‘मैं खिलाडी तू अनाडी’ यांसारख्या चित्रपटातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. यानंतर त्याने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आपल्या अभिनयाने चर्चेत असणारा हा अभिनेता अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अशातच सैफने एकदा रस्त्यात एका माणसाशी वाद घातला होता  आणि या वादातून त्याने त्या व्यक्तीचा चावादेखील घेतला होता. सैफचा जवळचे मित्र, अभिनेता व चित्रपट निर्माते कमल सदाना यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे.

सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखतीदरम्यान, कमल सदाना यांनी १९९० च्या दशकात घडलेली ही घटना सांगितली आहे. जेव्हा सैफ अली खान व अमृता सिंग एकत्र होते. यावेळी कमल असं म्हणाले की, “एकदा आम्ही (तो, सैफ व अमृता सिंग) कुठूनतरी घरी परतत होतो आणि सैफ गाडी चालवत होता. तेव्हा पाठीमागून एक कार आली आणि आम्हाला ओव्हरटेक करुन पुढे गेली. तेव्हा सैफने त्याला हाताने काही संकेत दिले असावेत.”

View this post on Instagram

A post shared by Kamal Sadanah (@kamalsadanah1992)

आणखी वाचा – छोट्या भावाचं निधन तर व्हेंटिलेटरवर आहे बहीण, ‘तारक मेहता…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर, म्हणाली, “आजारपणाचा संघर्ष…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “हे दोघे रस्त्याच्या मधोमध त्यांच्या कारमधून बाहेर पडले आणि त्यांच्यात हाणामारी झाली आणि ही हाणामारी इतकी गंभीर झाली की त्यांनी एकमेकांचा चावा घेतला. मात्र, नंतर दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागले आणि त्यांनी एकमेकांना मिठीही मारली. यानंतर हे दोघेही थेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि इंजेक्शन घेतले.”

आणखी वाचा – ‘झलख दिखला जा ११’चं विजेतपद पटकावलं, पण अजूनही मनीषा राणीला मिळाली नाही रक्कम, म्हणाली, “बक्षीसाची रक्कम…”

दरम्यान, सैफ अली खान व कमल सदाना हे आता चांगले मित्र असले तरी त्यांच्या नात्याची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण सैफने ‘बेखुदी’मध्ये त्यांची जागा घेतली होती आणि हा त्यांचा पदार्पणाचा चित्रपट होता. अभिनेत्री काजोलनेही या चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र नंतर त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली आणि ती आजही तशीच कायम आहे.

Tags: bollywood actorbollywood newssaif ali khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Suruchi Adarkar shared a post about ending her role in Satvya Mulichi Satavi Mulgi serial.

'सातव्या मुलीची…'मध्ये अखेर अस्तिकाचा अंत, मालिकेमधून बाहेर पडल्यानंतर सुरुची अडारकर भावुक, म्हणाली, "इतक्या कमी कालावधीत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.