रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ग्रहांच्या दुर्मिळ योगामुळे यंदाची रामनवमी असणार आहे खास, ‘या’ पाच राशींवर असणार प्रभू श्रीरामांची कृपा, जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 11, 2024 | 6:23 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Ram Navami 2024 is going to be special due to gajkesari and malavya rajyog

ग्रहांच्या दुर्मिळ योगामुळे यंदाची रामनवमी असणार आहे खास, ‘या’ पाच राशींवर असणार प्रभू श्रीरामांची कृपा, जाणून घ्या...

‘रामनवमी’ हा सण प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. काही धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला होता. म्हणून या दिवसाला रामनवमी असं म्हणतात. रामनवमी फक्त भारताच नाही तर जगभरात साजरी केली जाते. अशातच यावर्षीची रामनवमी हे खास आसणार आहे, कारण येत्या रामनवमीच्या दिवशी दुपारी अभिजीत मुहूर्तावर असाच शुभ योगायोग घडला आहे. ज्या मुहूर्तामध्ये प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता.

यावेळीही रामनवमीला सूर्य मेष राशीत असेल आणि दुपारी दहाव्या भावात असेल. भगवान रामाच्या कुंडलीत शुक्र ग्रह भाग्याच्या घरात असणार आहे. यावेळी रामनवमीलाही हा दुर्मिळ संयोग तयार झाला आहे. यावेळी रामनवमीच्या दिवशी दुपारपासून जन्मलेल्या मुलांमध्ये काही विशेष गुण असतील. तसेच कर्क राशीसह आणखी पाच राशींवर श्रीरामाचा विशेष आशीर्वाद असेल. चला तर जाणून घेऊयात त्या पाच राशी कोणत्या आहेत? याबद्दल…

मेष : भगवान रामाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना काही काळापासून ज्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता त्या आता दूर होतील. याशिवाय या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती इत्यादीचे सुखदेखील मिळू शकते. या काळात नोकरदार लोकाची पदोन्नती होईल. कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्याही प्रभू रामाच्या कृपेने दूर होतील आणि तुमच्या जोडीदाराबरोबरचे नातेही पूर्वीपेक्षा अधिक चांगले होईल.

आणखी वाचा – धक्कादायक! साखरपुड्यादिवशीच सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात दुर्देवी मृत्यू, संसाराची स्वप्न अपूर्णच राहिली अन्…

मकर : प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांची सर्व अडचणींपासून मुक्तता होईल. एका प्रिय व्यक्तीला बऱ्याच काळापासून भेटला नसाल तर ती भेट आता होऊ शकते. प्रगतीच्या नवीन संधीही निराम होतील. या काळात तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर वाढेल. तसेच तुमची संपत्तीही वाढेल.

कर्क : कर्क राशीच्या लोकांवरही रामाचा विशेष आशीर्वाद असेल. श्रीराम यांच्या आशीर्वादाने या काळात काही चांगली संधी मिळू शकते. तसेच, या कालावधीत, आपण एखाद्या व्यक्तीस भेटू शकता. ज्याच्याकडून भविष्यात आर्थिक लाभ होईल. याशिवाय, तुमचे कौटुंबिक जीवनदेखील पूर्वीपेक्षा बरेच चांगले होईल. याशिवाय समाजात तुमचा सन्मान वा आदरही वाढेल.

तूळ : भगवान रामाच्या आशीर्वादाने तूळ राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे आता पूर्ण होतील. जर तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते. या काळात पैसे दान करणे तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. गरजू लोकांना मदत केल्यास फायदाच होईल. करिअरमध्ये प्रगतीसाठी काही नवीन संधीही निर्माण होतील.

आणखी वाचा – सासरी रमली तितिक्षा तावडे, नाशिकमध्ये आहे प्रशस्त घर, शेअर केलेल्या फोटोंमध्ये सासू-सासऱ्यांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

मीन : मीन राशीच्या लोकांवर भगवान रामाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक परिणाम होतील. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. कुटुंबातही समृद्धी येईल. जुन्या कर्जातून सुटका मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला आहे. या कालावधीत गुंतवणूक केली तर चांगले फायदे होतील. याशिवाय तुमचे सर्व कौटुंबिक वादही मिटतील.

Tags: Ram NavamiRam Navami 2024
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
hina khan new look

Video : हिना खानने गुपचूप उरकलं लग्न?, भांगेत कुंकू भरलेला व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, "माझं लग्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.